पिंपरी-चिंचवड

पत्नीच्या चारित्र्यावर पती घ्यायचा संशय...मग पत्नी कामाला जाताना वाटेतच त्यानं...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चारित्र्याच्या संशयावरून पतीने भरदिवसा विवाहितेचा निर्घृण खून केला. ही घटना देहूरोडमधील साईनगर येथे रविवारी (ता. 5) उघडकीस आली. 

अबीदा करीमशाह शेख (वय 32, रा. वाघजाई सोसायटी, साईनगर, देहूरोड) असे खून केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर करीमशाह शेख असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा आयन करीमशाह शेख (वय 14) याने फिर्याद दिली. अबीदा या एका खासगी कंपनीत कामाला होत्या. तर करीमशाह वाहनचालक म्हणून काम करतो. तिघेही साईनगर येथे राहतात. दरम्यान, करीमशाह हा नेहमी अबीदा यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून त्यांच्यात वारंवार भांडण व्हायचे.

रविवारी (ता .5) सकाळी आठच्या सुमारास आबीदा या नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये कामाला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी करीम त्यांचा पाठलाग करीत होता. आबीदा या साईनगरकडून गहुंजेकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना अर्ध्या वाटेत करीमशाह याने अबीदा यांना अडविले. त्याच्याकडील धारदार कोयत्याने आबेदा यांच्या डोक्यावर आणि हातावर पाच ते सात सपासप वार केले. पत्नीवर हल्ला करून तो घटनास्थळावरून पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आबीदा यांना स्थानिक नागरिकांनी उपचाराकरिता देहूरोड येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फरारी आरोपीचा देहूरोड पोलिस शोध घेत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT