Murder 
पिंपरी-चिंचवड

मोशीत तरुणाचा खून; ओळख लपविण्यासाठी मृतदेह जाळला

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - मोशीतील प्राधिकरण येथे तरुणाचा खून झाल्याची घटना घडली असून मृताची ओळख लपविण्यासाठी मृतदेह ज्वलनशील पदार्थ टाकून जाळला आहे. 

प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 11 पार्क दहा येथील मोकळ्या मैदानात गुरुवारी (ता. 18) एक मृतदेह आढळला. तीस ते चाळीस वय असलेल्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. मृताची ओळख लपविण्यासाठी आरोपींनी ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळला आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासनीसह नागरिकांकडे चौकशी करून आरोपींचा शोध घेत आहेत. अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील मागील वीस दिवसांतील खुनाची सहावी घटना आहे. यातील दोन खुनाच्या घटनेतील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अशातच आणखी एक घटना समोर आली आहे. या घटनेतील मृतांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT