पिंपरी-चिंचवड

हिंजवडीत पोलिस महिलेच्या पतीचा खून

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शाब्दिक वादातून पाच जणांनी मिळून मुंबईत कार्यरत असलेल्या एका पोलिस महिला कर्मचाऱ्याच्या पतीचा खून केला. ही घटना हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात घडली. 

राजकुमार मुरलीधर घुगे (वय 48, रा. एमआयडीसी पोलिस वसाहत, महेश्‍वरीनगरजवळ, अंधेरी ईस्ट, मुंबई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रमेश तुकाराम गायकवाड (रा. कांदिवली, मुंबई ईस्ट) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नंदकुमार श्रीपतराव ढोकळे (वय 55), प्रमोद नंदकुमार ढोकळे (वय 32, दोघेही रा. नारायण कॉम्प्लेक्‍स, हिंजवडी) व प्रशांत नंदकुमार ढोकळे (वय 35, रा. जाधव वस्ती, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यासह आणखी दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मृत राजकुमार व आरोपी नंदकुमार यांची गुरुवारी (ता. 4) रात्री सव्वा अकराच्या सुमारास हिंजवडीमधील एका वाइन शॉपसमोर असताना, स्नॅक्‍स देण्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर फिर्यादी रमेश, राजकुमार व त्यांचे मित्र लक्ष्मी चौकातील एका हॉटेलमधून जेवण करून हॉटेलच्या बाहेर आले. दरम्यान, आरोपींनी संगनमत करून राजकुमार यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने राजकुमार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी रमेश यांना इथे न थांबता पुणे सोडून जाण्याची धमकी दिली. राजकुमार यांच्या पत्नी मुंबईत पोलिस दलात कार्यरत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉन्चपूर्वीच सिक्रेट जगजाहीर! समोर आली Samsung Galaxy A57 अन् A37 स्मार्टफोनची किंमत; पाहा सगळे वेरिएंट एका क्लिकवर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

SCROLL FOR NEXT