Beating Sakal
पिंपरी-चिंचवड

माचिस न दिल्याच्या कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला

माचिस न दिल्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला केल्याची घटना आकुर्डीत घडली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - माचिस (Matchbox) न दिल्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला (Murderer Attack) केल्याची घटना आकुर्डीत (Akurdi) घडली. हिमांशू मुन्नालाल गुप्ता (वय २९, रा.गुरुद्वारा चौक, चिंचवड) असे जखमी (Injured) तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Assault on a Young Man for Not Giving him a Matchbox)

त्यानुसार राजवंश राजमंदरसिंग दुधानी, अभिषेक बनसोडे (दोघे रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) व त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे गुरुवारी (ता. ३) सायंकाळी सातच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतर आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी दारू पिलेल्या आरोपी राजवंश याने फिर्यादीकडे माचिस मागितली. आपल्याकडे माचिस नसल्याचे सांगितले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली.

'तुझ्याकडे माचिस नाहीतर तू आमच्या एरियात का आला, असे म्हणत ढकलून दिले. माचिस न दिल्याच्या रागातून राजवंशने फिर्यादी यांच्या डोक्यात दगड घातला. तसेच लाकडी दांडक्याने पायावर मारून जखमी केले. त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून फिर्यादी यांना पुन्हा दगडाने, लाकडी दांडक्याने मारून गंभीर जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT