Crime Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : औंध येथील गायकवाड बाप-लेकावर आणखी एक गुन्हा दाखल

औंध येथील गायकवाड बाप-लेकाचा आणखी एक उद्योग समोर आला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - औंध येथील गायकवाड बाप-लेकाचा आणखी एक उद्योग समोर आला आहे. दहा लाख व्याज दिल्यानंतर एका गॅरेज चालकाकडून २२ लाख वसूल (Recovery) केल्यानंतरही पैशासाठी (Money) त्याला धमकाविणाऱ्या नाना गायकवाड व त्याच्या मुलासह चौघांवर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. हा प्रकार चिखली, औंध, सुसगाव येथे घडला.

नानासाहेब शंकर गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड (दोघे रा. औंध, पुणे), राजाभाऊ अंकुश व मिश्रा (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी चिखली येथील एका गॅरेज चालकाने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांचे साने चौक येथे गॅरेज आहे.

फिर्यादी यांना गॅरेजमध्ये नवीन मशिनरी आणण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी गायकवाड पिता-पुत्राकडून दहा लाख रुपये उसने घेतले. आरोपींनी फिर्यादीला पाच टक्के दराने कर्ज देऊन त्यांच्याकडून पाच-पाच लाख रुपयांचे दोन धनादेश लिहून घेतले. त्यानंतर गायकवाड यांनी फिर्यादी यांच्याकडून दहा लाख रुपये कर्जाच्या बदल्यात २२ लाख रुपये वसूल केले. तरीही मुद्दल व व्याज मिळण्यासाठी आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना कर्जाचे व्याज थकल्याचे सांगत वारंवार जिवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी राजाभाऊ याने फिर्यादी यांना त्यांच्या गॅरेजमधून जबरदस्तीने गाडीत घालून गायकवाड यांच्या औंध येथील घरी नेले. तिथून त्यांना सुसगाव येथील फार्म हाऊसवर नेवून दमदाटी व मारण्याची धमकी दिली. फिर्यादीला खोलीत कोंडून पिस्तुलचा धाक दाखवत हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली.

व्याजाचे पैसे वेळेवर दे नाहीतर तुला मारून टाकीन, अशी धमकी देत मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या पाच गुंठे जागेचे मूळ खरेदीखत जबरदस्तीने घेतले. पिंपळे निलख येथील गॅरेज चालकाला फार्म हाऊसवर नेऊन गोळीबार करत धमकी दिल्याचा प्रकार ताजा असतानाच आता हा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT