Narendra Patil Sakal
पिंपरी-चिंचवड

...म्हणून हातावर देवेंद्र टॅटू : नरेंद्र पाटील

औद्योगिक कंपन्या व माथाडी कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी पिंपरी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेतील एका प्रश्नावर ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व उभरते आणि चांगले आहे. भविष्यामध्ये त्यांच्याकडून चांगली कामे होणार आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. हा नेता आवडल्यामुळेच मी हातावर ‘देवेंद्र’ असा टॅटू काढला,’’ असे मनोगत महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.

औद्योगिक कंपन्या व माथाडी कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी पिंपरी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेतील एका प्रश्नावर ते बोलत होते. ते म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे औद्योगिक पट्ट्यासह सातारा औद्योगिक वसाहतीतील बरेच कारखानदार माथाडी कामगार कायद्याचे उल्लंघन करतात. याविषयी वारंवार कामगार आयुक्त, माथाडी बोर्ड आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. तरीही काहीच कारवाई होत नाही. या कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी.

कायद्यातील तरतूदीनुसार कारखानदारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतू वाहतूकदारांच्या नावे नोंदणी केली जाते. यातून कामगारांचे आर्थिक शोषण होते. यासाठी मुळ कारखानदार मालकांची नोंदणी होणे आवश्यक आहे. हे सर्व माथाडी बोर्डच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तरी कारवाई होत नाही. यासाठी युनियनच्या वतीने पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. यातील बहुतांशी कारखानदार मजूरी बोर्डाकडे सुर्पूद करीत नाहीत. तर त्या ठेकेदाराकडे चुकीच्या माणसाकडे जमा करतात.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके, युनियनचे संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाले, माथाडी युनियन पुणे विभाग सचिव हणमंत तरडे, माथाडी युनियनचे माजी अध्यक्ष पोपटराव धोंडे, कामगार प्रतिनिधी विक्रम मोरे, अशोक साबळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT