पिंपरी-चिंचवड

Video : 'या' यंत्रणेमुळे कोरोना चाचण्यांचा वेग दुपटीने वाढणार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी Coronavirus : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे त्याच्या स्वयंचलित यंत्रणेचा वापर करून चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय राष्ट्रीय एड्‌स संशोधन संस्थेने (नारी) घेतला आहे. येत्या 25 मेपासून त्याची सुरुवात होणार असल्याचे संस्थेचे संचालक डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाची चाचणी घेण्यासाठी आता स्वयंचलित यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक मशिनचा वापर करण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे सध्या दिवसाला होणाऱ्या चाचण्यांच्या प्रमाणात दुपटीने वाढ होणार आहे. सध्या नारीकडे विविध भागातून कोरोनाचे सॅम्पल तपासणीसाठी येत असतात. याठिकाणी दिवसाला साधारणपणे 70 ते 75 सॅम्पलची तपासणी करण्यात येते. स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्यानंतर दररोज 150 ते 160 सॅम्पलची तपासणी करणे शक्‍य होणार आहे. या यंत्रणेमुळे तपासणीसाठी सध्या तपासणीसाठी खर्च होणारा वेळ कमी होणार आहे. याखेरीज कोविड 19 साठी तयार करण्यात येणाऱ्या किटची तपासणी करण्याचे कामही संस्थेकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताण कमी होण्यास मदत होणार... 

कोरोनाच्या सॅम्पलची तपासणी करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या स्वयंचलित यंत्रणेमुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. याखेरीज सॅम्पलची तपासणी लवकर होणार असल्यामुळे संबधित रुग्णाला उपचार करण्यासाठी ते उपयुक्‍त ठरणार आहे. सध्या कोरोनाची चाचणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेबरोबरच अन्य खासगी लॅबमध्ये देखील करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT