पिंपरी-चिंचवड

शैक्षणिक शुल्काचा पालकांकडे तगादा लावणाऱ्यांसाठी राष्ट्रवादीची ही मोहीम  

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शाळा, महाविद्यालये, क्‍लासेस यांनी शुल्क निश्‍चितीबाबत पालकांकडून निश्‍चित धोरण ठरविणे गरजेचे आहे. निश्‍चित केलेले शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी, यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसकडून 'कोरोना शिक्षण शुल्कनीती अभियान' मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितले आहे. 

सध्या कोरोना महामारीचे संकट घोंघावत आहे. लॉकडाउनचे परिणाम गेल्या तीन महिन्यांपासून अर्थव्यवस्थेवर पडले आहेत. उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. अनेकांच्या हाताला काम नाही. पालक आणि शाळा महाविद्यालयेही त्याला अपवाद नाही. परिणामी शाळा महाविद्यालयांना उत्पन्नाचा स्रोत उरला नाही. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि वार्षिक अभ्यासक्रमाचे नुकसान होऊ नये म्हणून काही ठिकाणी ऑनलाइन वर्ग चालू केले आहेत. मात्र, काही शाळा, महाविद्यालये अधिकचे शैक्षणिक शुल्क पालकांकडून जबरदस्तीने घेताना आढळून येत आहे. काही ठिकाणी पालकांकडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला जात आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये. शक्‍य असेल तेवढे शुल्क शैक्षणिक संस्थांनी कमी करावे. कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये. केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्याला शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये. पालकांना शैक्षणिक संस्थांकडून नाहक त्रास झाल्यास विद्यार्थी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेणार आहे.'' 
- सुनील गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : नागपुरात हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; रात्री जोरदार पावसाची हजेरी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT