पिंपरी-चिंचवड

मावळात कोरोना रुग्ण संख्येचा चढ-उतार; आज २७ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा चढ-उतार सुरूच आहे. मंगळवारी (ता. २८) दिवसभरात २७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे  एकूण रुग्ण संख्या ६४० वर पोचली आहे. मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २७ जणांमध्ये तळेगाव येथील सर्वाधिक १७, कामशेत येथील दोन; तर लोणावळा, वडगाव, वराळे, सोमाटणे, शिरगाव, साते, पिंपळोली व ब्राम्हणवाडी (बऊर) येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६४० झाली असून, त्यात शहरी भागातील २८१, तर ग्रामीण भागातील ३५९ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक १९८, लोणावळा येथे ४८, तर वडगाव येथील रुग्ण संख्या ३६ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी १६ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या ३८६ सक्रिय रुग्ण असून, त्यातील १८८ जण लक्षणे असलेले व १९८ जण लक्षणे नसलेले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
लक्षणे असलेल्या १८८ जणांपैकी १२८ जणांमध्ये सौम्य स्वरूपाची, तर ५३ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. पाच जण गंभीर व दोन जण अत्यवस्थ आहे. सध्या १८८ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून, १९८ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT