पिंपरी-चिंचवड

मावळात आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली; किती रुग्ण आढळले पाहा

ज्ञानेश्वर वाघमारे

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात शनिवारी (ता. 8) पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली. दिवसभरात ३५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर तळेगाव येथील कोरोनाबाधित ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार ६४, तर मृतांची संख्या ३१ झाली आहे. ६३१ जण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या ३५ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १०, वडगाव येथील सहा, लोणावळा येथील पाच, परंदवडी येथील तीन, ब्राम्हणवाडी येथील दोन; तर चांदखेड, कान्हे, वराळे, ऊर्से, धामणे, गहुंजे, आढले बुद्रुक, थोराण व नवलाख उंब्रे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ६४ झाली. त्यात शहरी भागातील ५२८, तर ग्रामीण भागातील ५३६ जणांचा समावेश आहे. तळेगावात रुग्ण संख्येचा ओघ सुरूच असून, तेथील संख्या ३५५ झाली आहे. लोणावळा येथे ९९, तर वडगाव येथील रुग्ण संख्या ७४ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ६३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी सात जणांना घरी सोडण्यात आले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यात सध्या ४०२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २७१ जण लक्षणे असलेले, तर १३१ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २७१ जणांपैकी १९८ जणांमध्ये सौम्य, तर ६१ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १० जण गंभीर व दोन जण अत्यवस्थ आहे. सध्या ३७८ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून, २४ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘अँटी ड्रोन सिस्टीम’चा वापर; विनाकारण ड्रोन उडविणाऱ्यांवर होणार पोलिसांची कारवाई

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT