पिंपरी-चिंचवड

मावळात ४५ नवे पॉझिटिव्ह; सहा जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात ४५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर  कोरोनाबाधित सहा जणांचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार १५४, तर मृतांची संख्या ४१ झाली आहे. ६९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तळेगाव येथील ८१ व ६८ वर्षीय पुरुष व ८५ वर्षीय महिला, कामशेत ६४ वर्षीय तसेच वडगाव येथील ६२ व ५० वर्षीय पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. त्यांना इतरही काही आजार होते. 

सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ४५ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक १७, तळेगाव दाभाडे येथील १२, कामशेत येथील चार, वडगाव, माळवाडी व सोमाटणे येथील प्रत्येकी दोन तर चांदखेड, बेबडओहळ, धामणे, सुदवडी, मोहितेवाडी व आंबी येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार १५४ झाली असून, त्यात शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येकी ५७७ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ३७६, लोणावळा येथे १२२, तर वडगाव येथील रुग्ण संख्या ७९ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ६९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी पाच जणांना घरी सोडण्यात आले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यात सध्या ४२३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २८४ जण लक्षणे असलेले, तर १३९ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २८४ जणांपैकी २१२ जणांमध्ये सौम्य, तर ५८ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १३ जण गंभीर व एक जण अत्यवस्थ आहे. सध्या ३९९ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून, २४ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ.गुणेश बागडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Maratha Reservation Protest: जेवळीतील पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन; उपोषण स्थगित तरी मराठा आरक्षणासाठी लढा कायम

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

SCROLL FOR NEXT