Corona-patient
Corona-patient 
पिंपरी-चिंचवड

मावळात दिवसभरात ७८ नवीन पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ - मावळ तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा चढ-उतार व मृत्यूंचा सिलसिला सुरूच आहे. मंगळवारी दिवसभरात ७८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनाबाधित तिघांचा मृत्यू झाला. कामशेत येथील ५० व ६७ वर्षीय तर लोणावळा येथील ७७ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे.

तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या २ हजार ४६९ झाली असून आत्तापर्यंत ९८ जणांचा मृत्यू  झाला आहे. १ हजार ७३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ७८ जणांमध्ये लोणावळा येथील तब्बल ४२, तळेगाव दाभाडे येथील १६, कामशेत येथील पाच, माळवाडी येथील तीन, इंदोरी, नवलाख उंब्रे व काले येथील प्रत्येकी दोन तर टाकवे बुद्रुक, धामणे, दारूंब्रे, नाणे, लोहगड व ब्राम्हणवाडी ( करंजगाव ) येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ४६९ झाली असून त्यात शहरी भागातील १ हजार ३७६ तर ग्रामीण भागातील १ हजार ९३ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक ८०६, लोणावळा येथे ४११ तर वडगाव येथे रुग्णसंख्या १५९ एवढी झाली आहे. आत्तापपर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर १ हजार ७३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी ३६ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ६३९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३२२ जण लक्षणे असलेले तर ३१७ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ३२२ जणांपैकी २१३ जणांमध्ये सौम्य तर ९१ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १८ जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ६३९ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT