Crime
Crime esakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri News : डोळे उघडण्यापूर्वीच बघितले भयानक जग!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘त्यांच्या’ रडण्याचा आवाज आला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. पण ‘त्यांनी’ डोळेही उघडले नव्हते आणि त्यापूर्वीच ‘त्यांना’ या भयानक जगाचे दर्शन झाले.

नवजात अर्भकांची पैशांसाठी तस्करी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. या महिलांनी पाच अर्भकांची तस्करी केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील सर्व सहा आरोपी महिला पुण्यातील असून, त्यात नामांकित रुग्णालयातील एका परिचारिकेचाही समावेश आहे.

सईदा भीमराव कांबळे (वय ३५, रा. गोखलेनगर, शिवाजीनगर, पुणे), सुप्रिया शरद वाघमारे (वय ३९, रा. नवनाथ कॉलनी, केशवनगर, धनकवडी, पुणे), ललिता दत्तात्रेय गिरीगोसावी (वय ४५, रा. येरवडा), अफ्रिन दानेश शेख (वय २५, रा. पांढरेमळा, हडपसर), अमरीन रहीम सय्यद (वय ३२, रा लक्ष्मीनगर, येरवडा), आसमा जावेद शेख (वय ३०, रा. पांढरेमळा, हडपसर) अशी महिला आरोपींची नावे आहेत.

वाकड परिसरातील जगताप डेअरी परिसरात काही महिला अर्भकाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचला. दरम्यान, त्या ठिकाणी दोन रिक्षांतून सहा महिला आल्या.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्यातीलच एका महिलेचे सात दिवसांचे अर्भक पाच लाख रुपयांना विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता, त्यांना १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

असा चालायचा व्यवहार

ज्या दाम्पत्यांना वंध्यत्वाची समस्या आहे, अशांची माहिती या टोळीतील परिचारिका अन्य आरोपी महिलांना देत होती. त्यानंतर त्या दाम्पत्यांशी संपर्क साधून त्यांना पाच ते सात लाख रुपयांत बाळ विकत देण्याबाबत सांगत. ज्या दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा दाम्पत्याला पैशांचे आमिष दाखवून या टोळीतील महिला अर्भक घेऊन व्यंध्यत्व समस्या असलेल्या दाम्पत्याला विकत होते. ज्या दाम्पत्यांनी या टोळीतील महिलांकडून अर्भक घेतले आहे. अशा दाम्पत्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT