पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : चारचाकी वाहनांसाठी 'ही' नवी मालिका होतेय सुरू

श्रावण जाधव

मोशी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने पिंपरी चिंचवड व पुणे कार्यालयांमध्ये चारचाकी वाहनांसाठी नवीन 'JE' ही मालिका सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. या मालिकेतील आकर्षक पसंतीच्या क्रमांकाकरिता चारचाकी वाहनांसाठी प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास लिलाव पद्धतीने क्रमांकाचे वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

वाहनांची नवीन मालिका सुरू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड नवीन इमारत, पेठ क्रमांक 6, मोशी प्राधिकरण येथे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा तसेच, सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचा संसर्ग वाढू नये म्हणून आणि त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या चारचाकी वाहनमालकांना नव्याने सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील, त्यांनी 29 जुलै रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी अडीच या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करावा. हा अर्ज कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, ओळखपत्र पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह जमा करावा. तसेच, डीडी डी. वाय. आरटीओ पिंपरी-चिंचवड यांच्या नावे राष्ट्रीय शेड्युल बँकेचा पुणे येथील असावा.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
     
अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो, ओळखपत्र, केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम चार, तसेच महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 च्या नियम पाचमध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची (उदाहरणार्थ आधार कार्ड, टेलिफोन बिल) इत्यादी साक्षांकित झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे. चारचाकीची यादी 30 जुलै रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल, तर त्यांनी 30 जुलै रोजी दुपारी दोन वाजून 30 मिनिटांपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर संबंधित अर्जदार लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल, त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही, तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, असेही यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT