पिंपरी-चिंचवड

महत्त्वाची बातमी : पिंपरी-चिंचवडकरांनो, आखाड साजरा करता येणार; कारण लॉकडाउन... 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : आखाड म्हटलं, की अनेकांना आठवतात 'झणझणीत' मांसाहाराच्या पार्ट्या. आखाड अर्थात आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या. दीप अमावस्या म्हणून तिला साजरी केली जाते. मात्र, मांसाहार खवय्यांच्या तोंडी 'गटारी अमावस्या' असा नामोल्लेख केला जातो. या दिवशी अनेक जण मांसाहार करतात. कारण, दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो. आणि श्रावण म्हटलं, की बहुतांश घरात महिलांचे उपवास, व्रत, वैकल्य, सण, गोडधोड केले जाते. किमान महिनाभर अनेक जण हे व्रत पाळतात. त्यामुळे आषाढाच्या शेवटच्या दिवशी अनेकांचा मांसाहारावर जोर असतो. तो शेवटचा दिवस सोमवार असला, तरी त्याच्या अगोदर रविवार आलेला आहे. त्यामुळे आखाड साजरा करता येणार आहे. 

किराणासह मटण, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. सोमवारपासून मात्र, सकाळी आठ ते दुपारी 12 अशी दुकानांची वेळ असेल.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे 14 जुलैपासून प्रशासनाने पुणे शहर व जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे आखाड साजरा करता येणार की नाही, अशी चर्चा खवय्यांमध्ये सुरू होती. त्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे. कारण, कडक लॉकडाउनचे पाच दिवस पूर्ण झाले आहे. उर्वरित पाच दिवस काही प्रमाणात नियमात शिथिलता आणली आहे. रविवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. महापालिका आयुक्तांच्या नव्या आदेशानुसार रविवारपासून किराणा दुकानांसह चिकण, मटन, मासळी, अंडी विक्रीची दुकाने खुली होणार आहेत. त्यांना वेळा ठरवून दिल्या आहेत. त्यामुळे खवय्यांना आखाडाचे शेवटचे दोन दिवस का होईना, आखाड साजरा करता येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, सोमवारी (ता. 20) अमावस्या आहे. सोमवती अमावस्येला अनेक जण मांसाहार करीत नाहीत. तसेच, दर सोमवारीही बहुतांश जण मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे उद्याचा रविवारच खवय्यांना आखाड साजरा करण्यासाठी मिळाला आहे. दरम्यान, रविवारपासून किराणा दुकाने, भाजीपाला, फळे विक्रीलाही परवानगी असल्याने सोमवारची दीप अमावस्याही गृहिणींना साजरी करता येणार आहे. 

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT