पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांची आज चिंता वाढली; दिवसभरात 31 जण पॉझिटिव्ह, तर...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील आणखी 31 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळून आले. तर बरे झाल्याने 26 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान, आज (मंगळवार) दापोडी व वाल्हेकरवाडी येथील दोन महिलांसह पुण्यातील पुरुष व दौंडमधील महिलेचाही मृत्यू झाला. 

सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत 31 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे वायसीएम व भोसरी रुग्णालयांत दाखल एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 568 झाली आहे. त्यापैकी 254 जणांवर उपचार सुरू आहेत. तर, 304 जण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत शहरातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात दापोडी व वाल्हेकरवाडी येथील महिलांचा समावेश आहे. तसेच, शहराबाहेरील रहिवासी मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात उपचार घेणाऱ्या चौदा जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेली एक 55 वर्षीय महिला दापोडी येथील रहिवासी आहे. तर दुसरी 65 वर्षीय महिला दौंड येथील रहिवासी आहे. वाल्हेकरवाडी चिंचवड येथील महिलेचे वय 40 वर्ष आहे. पुण्याच्या मंगळवार पेठेतील 79 वर्षीय पुरुषाचाही मृत्यू झाला आहे. 

आज पॉझिटीव्ह आढळलेल्या व्यक्ती आनंदनगर चिंचवड, वाकड, पिंपळे सौदागर, काळेवाडी, भोसरी, दापोडी, पिंपरी, किवळे, सांगवी, अजंठानगर, देहूरोड, पुण्यातील कसबा पेठ, खडकी, दौंड व आंबेगाव येथील आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आजपर्यंत सर्वाधिक रुग्ण आनंदनगर चिंचवड स्टेशन, रुपीनगर- निगडी, भोसरी- गावठाण परिसरात आढळले आहेत. त्यामुळे हे तीनही ठिकाणे हॉटस्पॉट ठरली आहेत. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून येथील रुग्णही बरे होऊन घरी परतू लागली आहेत. बरे झालेल्या सर्वांना चौदा दिवस घरातच थांबण्याच्या अर्थात होमक्‍वारंटाइनची सूचना प्रशासनाने केलेली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुंबईत पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अलर्ट

'भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ', अन्यायापासून मुक्ती; रुग्णालयातून सोनम यांचा पहिला मेसेज

Live Updates Marathi: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरळीत कामकाजासाठी सर्वपक्षीय सहकार्याचे आवाहन

Pakistan Fuel Prices: पाकिस्तानचा मोठा निर्णय! आता पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलणार; सरकारची नवी इंधन धोरण घोषणा

Locked Jaw: जांभई देताना किंवा जेवताना जबडा लॉक होतोय? स्नायू फाटण्याचा धोका! जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT