पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : गणेशमूर्ती स्टॉलधारकांना यंदा परवानगी मिळणार, मात्र...

आशा साळवी

पिंपरी : गणरायाच्या आगमनाला अवघा एक महिना उरला आहे. त्यासाठी शहरातील असंख्य मुर्तीकारांनी सुबक गणेश मूर्ती बनविल्या आहेत. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, महापालिकेने नेहमीच्या निकषांत बदल केला आहे. गणेशमूर्ती स्टॉलधारकांना काही अटी व शर्ती लागू केल्या आहेत. त्यानुसारच विक्रेत्यांना यंदा स्टॉलसाठी परवानगी मिळणार आहे. परंतु, अद्याप महापालिका प्रशासनासोबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक न झाल्याने तिढा कायमच आहे. 

पिंपरी महापालिकेच्या हद्दीत साधारणत: दीड हजार छोटी-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. दरवर्षी पिंपरीगाव, चिंचवडगाव, संत तुकारामनगर, एम्पायर इस्टेट चिंचवड स्टेशन, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, काळेवाडी, थेरगाव, निगडी, रुपीनगर, भोसरी गावठाण, दिघी आदी परिसरात सलग गणेशमूर्ती विक्रेत्यांचे स्टॉल लागलेले असतात. एकेका गणेश मुर्तीकार यांच्या नावावर पाच ते दहा स्टॉल असतात. त्यामुळे इतरांना संधी कमी मिळते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसाठी एका स्टॉलधारकाच्या नावावर एकच स्टॉल असणार आहे. एकेका स्टॉलमध्ये पाच फुटांचे अंतर आवश्‍यक आहे. त्यांनी स्टॉलला सॅनिटायझर करणे आवश्‍यक असून, एकेक मीटरवर ग्राहकांनी थांबले पाहिजे, या सुविधा देणे आवश्‍यक आहे. याची तपासणी करूनच स्टॉलधारकांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज करणे आवश्‍यक आहे. असे निकष महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाने लावले असून, प्रशासनाकडे अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती प्रशासन अधिकारी महेश कोळप यांनी दिली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्यावर्षी भूमी व जिंदगी विभागाने स्टॉलसाठीच्या दरवर्षी मूळ भूईभाडे रक्कम आकारणीत साडेबारा टक्के वाढ करण्याचे धोरण अवलंबले आहे. गेल्यावर्षी दीड हजार रुपये केल्याने बरेच वादंग झाले. हे नियम पुढील पाच वर्षासाठी लागू केल्याने दरवर्षी मूळ रक्कमेवर साडेबारा टक्के रक्कम आकारण्यात येणार आहे. यावर्षी दहा बाय पंधरा असा 950 चौरस फुट जागेसाठी स्टॉलधारकांना दीड हजार रुपयांऐवजी 1 हजार 680 रुपये मोजावे लागणार आहेत. शाडू आणि पीओपीच्या मुर्त्यांसाठी स्वतंत्र स्टॉल असणार आहे. यासाठी अनेक प्राप्त झालेल्या अर्जानुसार एका घरातील किती जणांच्या नावावर स्टॉल आहेत, याची पडताळणी सुरू आहे. पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळ, स्टॉलधारकांची बैठक बोलविण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव रद्द झाल्याने अद्याप कशापद्धतीने स्टॉलधारकांना परवानगी देण्यात येणार आहे, याविषयीचा निर्णय अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT