NK Patil sakal
पिंपरी-चिंचवड

Crime News : महिलांशी असभ्य वर्तणूकही भोवली! तळेगावचे मुख्याधिकारी पाटील निलंबित

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील यांना अखेर राज्य शासनाने निलंबित केले.

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन - तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील यांना अखेर राज्य शासनाने निलंबित केले. ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह, महिला कर्मचाऱ्यांसमवेत असभ्य वर्तणूक करणे यासह इतर प्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी सोमवारी (ता.८) वरील आदेश काढला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा तथा एन. के. पाटील यांच्या विरोधात स्थानिक नागरिक, नगर परिषदेतील कर्मचारी व अनेक सामाजिक संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे, त्यांची गेल्या एक डिसेंबरला पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुदतपूर्व बदली करण्यात आली होती. मात्र, त्याला ‘मॅट’मध्ये आव्हान देत पाटील आठवडाभरातच पुन्हा रुजू झाले होते.

ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हा

तळेगाव दाभाडे येथे १ जून रोजी मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवून दोन वाहनांना धडक दिल्यानंतर पाटील हे घटनास्थळावरून पळून गेले. या अपघात प्रकरणी त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

लक्षवेधी मांडण्यापूर्वीच निलंबन

पाटील यांच्या वादग्रस्त कारकिर्दीबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी आणि नगर परिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त यांनी देखील नगर विकास विभागाला अहवाल पाठविला होता. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके हे देखील याप्रकरणी लक्षवेधी मांडणार होते. मात्र, तत्पूर्वीच, त्यांचे निलंबन झाले. पुढील आदेश निघेपर्यंत पाटील हे निलंबित राहणार आहेत. या कालावधीत पाटील यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे राहावे लागणार आहे.

काय होत्या तक्रारी ?

  • राज्य शासनाची प्रतिमा मलिन करणे

  • आरोग्य, पाणी, स्वच्छता यासह इतर नागरी

  • सुविधांबाबत कर्तव्यात कसूर

  • नगर परिषदेचे कर्मचारी, नागरिक यांच्याशी अर्वाच्च भाषेत बोलणे

  • कार्यालयीन वेळेत मद्यपान; महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तणूक

आदेशात आणखी काय म्हटले ?

  • पूर्वपरवानगी शिवाय जिल्हाधिकारी कार्यालय सोडण्यास मनाई

  • खासगी नोकरी अथवा कोणताही व्यवसाय करण्यास बंदी

  • अन्यथा दोषी समजून कारवाई करण्यास पात्र होणार

  • निर्वाहभत्ता मिळण्याचा हक्क ते गमावणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT