Digambar Shinde
Digambar Shinde Sakal
पिंपरी-चिंचवड

कलेला वय नसते, सत्तरवर्षीय ज्येष्ठ नागरिक दिगंबर शिंदे रांगोळीतून करतात समाजप्रबोधन

रमेश मोरे

कला छंद जोपासायला वयाचे बंधन नसते याचा प्रत्यय अनेकदा अनेकांच्या कलाविष्कारातून दिसून येतो.

जुनी सांगवी - कला (Art Hobby) छंद जोपासायला वयाचे बंधन नसते याचा प्रत्यय अनेकदा अनेकांच्या कलाविष्कारातून दिसून येतो. दापोडी येथील दिगंबर एकनाथ शिंदे (वय ७० वर्षे) या ज्येष्ठानी रांगोळीच्या (Rangoli) माध्यमातून कलाकृती साकारण्याचा छंद जोपासला आहे. खाजगी नोकरी करत वेळ मिळेल तेव्हा रांगोळीच्या माध्यमातून विविध विषयांवर रांगोळी साकारत समाज प्रबोधन (Social Enlightenment) केले. तर नोकरीतून सेवानिवृत्ती नंतर त्यांनी रांगोळी चित्रकला या विषयात वाहून घेतले आहे.

लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्यामुळे निवृत्तीनंतर आयुष्य कुटुंबासोबत व्यतीत करत असताना रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. या क्षेत्रातील कुठलाही कोर्स, डीग्रीचे शिक्षण त्यांनी घेतलेले नाही. आवड व स्वतःच्या सरावातून रांगोळीतून उत्कृष्ट कलाकृती साकारण्यात त्यांचा हातखंडा आहे. गणेशोत्सवात दरवर्षी एक विषय घेऊन ते रांगोळी प्रदर्शन भरवत असतात. सध्या गेली दोन वर्षांपासून कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना आलेले निर्बंध यामुळे या अवलियाने राहत असलेल्या सोसायटी परिसरातील सोसायटी कार्यालयातील फरशीवर रांगोळीच्या माध्यमातून 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, ही थीम विविध रंगी रांगोळीतून साकारली आहे. या कलेला घरातील सर्व सदस्यांचा तसेच परिसरातील नागरिकांचा चांगला पाठिंबा मिळतो, असे दिगंबर शिंदे सांगतात. नागरिकांना रांगोळी कलेमधून सामाजिक जागृती करणे सोपे आहे. असे ते सांगतात. सन २००५ पासून त्यांनी वेगवेगळ्या विषयावर आजवर रांगोळी काढली आहे.

भ्रष्टाचार, संत दर्शन, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न, ऑलिंपिक खेळाडू, साहित्यिकांचा मेळा, रामायण-महाभारत तसेच, भगवान विष्णूचे दशावतार इत्यादी अनेक विषयावर यापुर्वी त्यांनी रंगावली प्रदर्शन भरवली आहेत. सध्या आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतम होत्सवानिमित्त ७५ वर्षांमधील ठळक प्रसंग रांगोळीच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान स्वीकारण्याचा प्रसंग यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडीत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, श्री राजगोपालचारी, मौलाना अब्दुल कलाम यांच्या हुबेहुब रांगोळी त्यांनी साकारलेली आहे. याचबरोबर लालबहादूर शास्त्री, जय जवान जय किसान, इंदिरा गांधी, बांगलादेश मुक्ती करार, पी व्ही नरसिंहराव मुक्त अर्थव्यवस्था व त्याचे जागतिक चिन्ह, अटल बिहारी बाजपेयी अणुबॉम्ब चाचणी, कारगिल युद्ध, नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया, औद्योगिक सुधारणा, कलम ३७०, राम मंदिर, चांद्रयान मोहीम अंतराळ यान कार्यक्रम हे विषय रांगोळीतून रेखाटले आहेत. तर ही रांगोळी काढण्यास सलग पाच दिवस लागल्याचे शिंदे सांगतात.

दापोडी येथील गणेश कॉर्नरच्या सोसायटीच्या कार्यालयातील फरशीवर ही रांगोळी साकारली आहे. सन १९७६ ला सासवड येथील वाघेरे कॉलेजमधून बीकॉम झाल्यानंतर १९८१ साली भोसरी येथे एका खासगी कंपनीमध्ये स्टोअर मध्ये ते तीस वर्षे नोकरी केली. २०१३ साली मी सेवानिवृत्तीनंतर सासवड, पुणे, पिंपरी-चिंचवड दापोडी परिसरात उत्सवामधून त्यांनी अनेक राजकीय सामाजिक धार्मिक विषयावर रांगोळी व हलते देखावे केलेले आहेत. यात दारूबंदी, महागाई, भ्रष्टाचार, स्त्री मुक्ती आंदोलन, इत्यादी रांगोळी व अनेक हलते देखावे तयार केले. तर दरवर्षी गणपती उत्सवात नोकरीस असताना देखील वीस दिवसांची रजा टाकून त्यांनी कलेला वेळ दिल्याचे ते सांगतात. सध्या सेवानिवृत्ती नंतर या कलेत वेळ जातो.कलेला वय नसते हेच दिगंबर शिंदे यांच्या कलेच्या प्रेमातून दिसून येते.

कोरोनाकाळातील लॉकडाऊनच्या काळातही घरातच विविध विषयांवर रांगोळी साकारण्यात वेळ घालवला. कलेला वय नसते. त्यातून निखळ आत्मीक आनंद मिळतो. मनुष्य जिवनात अंगी एक तरी छंद कला जोपासायला हवी.

- दिगंबर शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: फायर फायटर डे का साजरा केला जातो? जाणून घ्या सोप्या शब्दात महत्त्व

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

SCROLL FOR NEXT