पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलिसांसाठी हे तीन दिवस ठरले...

मंगेश पांडे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांसाठी लॉकडाउन कालावधीतील 'ते' तीन दिवस ऐतिहासिक ठरले आहेत. या तीन दिवशी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलिस ठाण्यात एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही. आयुक्तालय कार्यान्वीत झाल्यापासून स्टेशन डायरी निरंक राहण्याचा असा प्रसंग तीन वेळा घडला आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्रच लॉकडाउन जाहीर झाल्यापासून शहरातील गुन्ह्यांचेही प्रमाण घटले आहे. अशातच 22 मार्चला पुकारण्यात आलेला जनता कर्फ्यू तसेच 20 एप्रिल व 2 मे या दिवशी, तर आयुक्तालयाच्या हद्दीत एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही. कोरोनाची सामान्य नागरिकांसह गुन्हेगारांनी घेतलेली धास्ती तसेच संचारबंदीमुळे पावलोपावली उभे असलेले पोलिस यामुळे हा परिणाम झाल्याचे समोर येत आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुक्तालयांतर्गत असलेल्या पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, वाकड सांगवी, हिंजवडी, दिघी, चाकण, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी या 15 पोलिस ठाण्यांमध्ये दररोज प्रत्येकी किमान दोन-तीन गुन्ह्यांची नोंद होत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लैंगिक अत्याचार, विनयभंग, चोऱ्या आदी गुन्ह्यांचा समावेश असायचा. मात्र, 22 मार्चला जनता कर्फ्यू पुकारल्यानंतर लगेचच सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आले. सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली, त्यामुळे पोलिसांनी शहरातील मुख्य चौकांसह रस्त्यांवर नाकाबंदी केली. वाहनांची तपासणी केली जात आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांकडे चौकशी केली जात असल्याने गुन्हेगारही घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे पोलिसांचा धाक असल्याने गुन्हेगारी घटना कमी झाल्या असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी सर्व पोलिस ठाणे मिळून दरदिवशी किमान 30 ते 35 असे गुन्हे दाखल होण्याचे असलेले प्रमाण आता केवळ सहा ते सात गुन्ह्यांवर आले आहे. यातच 22 मार्च, 20 एप्रिल व 2 मे या दिवशी तर एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होत असलेल्या कारवाई व्यतिरिक्त इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याने पोलिसांवरीलही कामाचा काहीसा भार हलका झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT