पिंपरी-चिंचवड

जुनी सांगवीत पावसामुळे शुकशुकाट; रस्त्यावरील नेहमीच्या गर्दीलाही ब्रेक

रमेश मोरे

जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : सोमवार मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसाच्या हलक्या-मध्यम सरींनी वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या पावसाची रिपरिप मंगळवार दिवसभर सुरूच राहिला. त्यामुळे बाजारपेठा व रस्त्यावरील नेहमीच्या गर्दीलाही ब्रेक लागल्याचे चित्र जुनी सांगवी व दापोडी परिसरात पहायला मिळाले.

सेमवारी (ता. ३) रक्षाबंधनामुळे बाजारपेठेतील वर्दळीनंतर मंगळवारी सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला. तर नेहमीप्रमाणे भाजी खरेदी व किराणा दुकानांवर होणारी गर्दीही दिसली नाही. रस्तेही ओस पडले होते. तसेच, पावसामुळे वातावरणात गारठा वाढल्याने नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुनी सांगवी येथील एकता चौक ते शितोळेनगर या परिसरातील भाजी विक्रेते, फळविक्रेते यांच्याकडे ग्राहकांची तुरळक ये-जा पहायला मिळाली. आधीच कोरोना व त्यात वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला आदी व्हायरल आजारापासून दूर राहण्यासाठी अनेकांनी घरीच राहणे पसंत केले. वॉशिंग सेंटर, पंक्चरची दुकाने गॅरेजवरही ग्राहक फिरकला नाही. दुकानांवरील कामगांरांनी पावसाचा आनंद घेत कामाविना बसूनच दिवस काढल्याचे चित्र परिसरातून पहावयास मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT