Nursery Admission
Nursery Admission sakal
पिंपरी-चिंचवड

Nursery Admission : डोनेशन नाही तर प्रवेश नाही! नर्सरी प्रवेशातून होत आहे लाखोंची लूट

आशा साळवी

पिंपरी - उद्योगनगरीत सध्या पूर्वप्राथमिक (नर्सरी) प्रवेशाला सुरुवात झाली आहे. इंग्रजी माध्यमांच्या नर्सरींतील प्रवेशासाठी मार्चपासूनच फॉर्मचे वाटप सुरू होते. मात्र, प्रत्येक शाळेचे निकष आणि वेळापत्रक वेगवेगळे असल्याने पालकांची कोंडी होत आहे. नर्सरी प्रवेशासाठी कोणतेच निकष नसल्याने आणि या प्रवेशावर कोणाचाच अंकुश नसल्याचा फायदा उचलत खासगी शाळांनी नर्सरी प्रवेशाचा मोठा बाजार मांडला आहे.

परिणामी, शहरातील प्रत्येक चौकात सुरू असणाऱ्या प्ले स्कूल, नर्सरी किंवा प्री-स्कूलकडून एका वर्षाचे किमान एक लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येते, तर नामांकित शाळांकडून ‘डोनेशन नाही, तर प्रवेश नाही,’ असा दमच पालकांना दिला जात आहे. परिणामी, शाळेकडून मनमानीपद्धतीने पालकांची लूट करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासकीय यंत्रणा मात्र तक्रारी करा- कारवाई करू, असा सल्ला देण्यात धन्यता मानत आहेत.

उज्वल भवितव्यासाठी चांगल्या शाळेत मुलांचा प्रवेश मिळवून देण्याकडे पालकांचा कल असतो. त्यामुळे, पालक खर्चाकडे पाहत नाहीत. या मानसिकतेचा फायदा घेत विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या पूर्वप्राथमिक शाळांमध्ये पालकांची लूट केली जात असल्याचे चित्र आहे. शहरात विविध खासगी शाळांमध्ये नर्सरी, केजी, प्ले स्कूल अशा वर्गापासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

नामांकित शाळांमध्ये बालवाडी प्रवेशासाठीही पालकांना धावाधाव करावी लागत आहे. प्रवेशासाठी सध्या पालकांची दमछाक होत आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने अत्याधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाच्या नावाने ही प्ले स्कूल पालकांकडून लाखो रुपये वसूल करत आहेत.

विशेष म्हणजे या प्ले स्कूल किंवा नर्सरी यांना शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नसून अनधिकृतपणे चालणाऱ्या या शाळांकडून पालकांची मोठी लूट होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी एल.केजी. वर्गासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्‍यात आले आहेत. प्रवेशाच्या पहिल्याच टप्प्यात पालकांकडून ‘वसुली’ करण्याची संधी संस्थाचालकांकडून साधण्यात येत आहे.

डोनेशन व्यतिरिक्तचा खर्च

गणवेश, शालेय साहित्य, वस्तू भांडार, संगणक, स्नेहसंमेलन यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. सेमी इंग्लिश अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे निमित्त करूनही ‘डोनेशन’ उकळण्यात येत आहे. संस्था सांगेल. त्याच दुकानातून गणवेश खरेदीची सक्ती केली जाते. नर्सरी, बालवाडी प्रवेशासाठी ५० हजारांपासून १ लाखांपर्यंत ‘डोनेशन’ घेण्यात येत आहे.

खासगी शाळेचे गणवेश, बूट, पीटी ड्रेस करिता विशिष्ट दुकाने कमिशन तत्त्वावर ठरवून दिलेले असतात. शंभर रुपये किमतीचा शर्ट तीनशे साडेतीनशे रुपयांपर्यंत विकला जातो. जो गणवेश तीनशे रुपयांना मिळायला पाहिजे, तो गणवेश ७०० ते ९०० रुपयांना विकला जातो. तर; दीडशे-दोनशे रुपयांना जो बूट मिळतो; तो बूट साडे तीनशे-चारशे रुपयांना खरेदी करावा लागतो.

प्रवेश अर्जापासूनच लूट

जून २०२४ मध्ये सुरू होणाऱ्या नर्सरीच्या वर्षासाठी काही शाळांमध्ये प्रवेशही झाले आहेत. नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी डिसेंबरपासूनच विचारणा सुरू होते. प्रवेश अर्जापासूनच या शाळांकडून लूट सुरू होते. शाळांचे प्रवेशअर्ज ५०० ते दोन हजार रुपयांपर्यंत विकले जातात. कायद्यानुसार, शाळांनी प्रवेश अर्जांसाठी कोणतेही शुल्क आकारता कामा नये, असा नियम आहे.

मात्र, कोणतेही कारवाईचे अधिकार नसल्याने शाळा कायद्यालाही जुमानत नाहीत, असे सध्या चित्र आहे. डोनेशनची पावतीही देण्याचे टाळले जाते. काही संस्था इमारत उभारणीसाठीची देणगी मिळाल्याची कमी रकमेची पावती पालकांना देत आहेत.

शाळांनी आकारलेले अन्य शुल्क...

  • गणवेश - ७०० ते ९०० रु.

  • बूट - ३०० ते ४०० रु.

  • पुस्तके - ५,५८५ ते ८,९२५ रु.

  • शाळेचे ॲप - ४ हजार

  • सुरक्षा - ३ हजार

  • ट्यूशन फी - ८२ हजार ते १.८८ लाख

(नर्सरी ते पाचवीपर्यंत)

नर्सरीच्या प्रवेशावर शिक्षण विभागाचा अंकुश नाही. त्‍यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नाही; पण पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास पुणे येथील शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात येतात.

- संगीता घोडेकर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

पालकांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश हवा असतो. अनेक शाळांमध्ये नर्सरीपासून प्रवेश प्रक्रिया राबवित असतात. पण काही सीबीएसई बोर्डाच्या शाळा लाखाच्या घरात शुल्क घेताहेत. यात इतर खर्च वेगळाच असतो. सर्व पैशाचे नियोजन करता करता पालकांच्या नाकीनऊ येतात.

- राहुल वंजारे, पालक, चिंचवड

सीबीएसई स्कूलने बाजार चालवला आहे. दरवर्षी मुलांना नवीन पुस्तके घ्यायला भाग पाडतात. नर्सरी आणि पहिलीच्या मुलांना पण शुल्क एक लाखाच्या पुढे आहे. सरकारने यावर अकुंश आणायला हवा.

- वैभव छाजेड, पालक, बिजलीनगर

शाळेचे प्रवेश शुल्क

  • नर्सरी किंवा प्री-स्कूल - १ लाख रु.

  • डोनेशन - ५० हजार ते १ लाख रु.

  • प्रवेश अर्ज - ५०० ते दोन हजार रु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT