पिंपरी-चिंचवड

खवैय्यांची मांसाहाराला दांडी; हॉटेल व्यावसायिकांवर येणार मंदीचे सावट  

सुवर्णा नवले

पिंपरी : मार्गशीर्ष महिना मंगळवारी (ता. 15) प्रारंभ होत आहे. या महिन्यात हॉटेल व रेस्टॉरंट मांसाहार व्यावसायिकांची बसलेली घडी पुन्हा विस्कटण्याची भीती आहे. मार्गशीर्षमध्ये गुरुवारचे महालक्ष्मी व्रत महिला वर्ग मनोभावे करीत असल्याने घरात व घराबाहेरही मांसाहार करण्यास पूर्णपणे कुटुंबाचा मज्जाव असतो. परिणामी, मांसाहारी अस्सल खवैय्यांची पुन्हा मांसाहाराला दांडी असल्याने हॉटेल व्यावसायिकांवर काही कालावधीसाठी मंदीचे सावट येण्याची भीती आहे. 

लॉकडाउनपासून हॉटेल व्यावसायिकांची घडी विस्कटली ती अजूनही सावरली नाही. श्रावण, गणपती, नवरात्र व नंतर मार्गशीर्ष महिना एकापाठोपाठ एक धार्मिक उत्सव आल्याने हॉटेल व्यावसायाला ग्रहण लागले आहे. शहरात पन्नास टक्के हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल व्यवसाय बंद केला. छोटे-मोठे व्यावसायिकही मेटाकुटीला आले. उरलेल्या व्यावसायिकांनाही कठीणाईचा सामना करावा लागत आहे. या व्यावसायिकांना जीएसटीही पाच टक्के भरणे अवघड जात असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या घरोघरी चिकण व मटनही बंद होणार असल्याने किरकोळ मांसाहार विक्रेतेही चिंतेत आहेत. जवळपास 25 टक्के मांसाहाराचा खप मार्गशीर्ष महिन्यात घसरणार असल्याची माहिती मासळी विक्रेत्यांनी दिली. सध्या चिकण 180 व मटन 200 रूपये किलोप्रमाणे आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यांत मांसाहाराची आवकही घटणार असल्याचे काळेवाडीतील व्यावसायिक महेश शिंदे यांनी सांगितले. 

उपवासाच्या पदार्थांवर भर 

मार्गशीर्ष महिन्यात काही भाविक महिनाभर उपवास करीत असल्याने उपवासाच्या पदार्थांनाच जास्त मागणी आहे. त्यामुळे व्हेज रेस्टॉरंट व हॉटेल व्यावसायिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्यापासून सावरणार आहे. साबुदाणा खिचडी, फलाहार व इतर उपवासाच्या पदार्थांनाच जास्त मागणी असते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis:...हा तर पोळी भाजण्याचा डाव; दिल्लीतील आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Maharashtra Revenue Department: महसूल विभागाच्या सेवाप्रवेश नियमांत ५० वर्षांनंतर बदल; चंद्रशेखर बावनकुळे: मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Live Updates Marathi : सरकार नीट परीक्षेच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चेला तयार

Petrol-Diesel Price Today: अमेरिकेत पेट्रोल महागल्यानंतर आज भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट! मुंबई-पुण्यात काय आहे भाव?

Farmer Loan Waiver: दोन लाख शेतकरी पहिल्या यादीत; कर्जमुक्ती योजना; आधार प्रमाणीकरण, फार्मर आयडी अनिवार्य

SCROLL FOR NEXT