पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सुरू होतेय ऑपरेशन...

आशा साळवी

पिंपरी : रस्त्यावर घोळके करून उभ्या राहणाऱ्या हिंस्त्र भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास अखेर सुरुवात झाली आहे. लॉकडाउनमध्ये महापालिका क्षेत्रात भटक्‍या कुत्र्यांची वाढलेली प्रचंड संख्या लक्षात घेता वैद्यकीय विभागाने श्‍वान निर्बीजीकरण केंद्र पुन्हा कार्यान्वित केले आहे. मंगळवारपासून (ता. 5) या भटक्‍या कुत्र्यांची 'धरपकड' करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात साधारणतः 90 हजार भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. पालिकेने अधिकृत श्‍वान गणना केली नसली, तरीही अंदाजित संख्या आहे. भटक्या, पिसाळलेल्या जखमी कुत्र्यांची संख्या वाढली आहे. गेल्यावर्षी सात हजार कुत्री पकडण्यात आली आणि त्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून सोडून दिली. मात्र, लॉकडाउनमुळे एक महिन्यापासून कुत्र्यांना पकडण्याचे काम बंद होते. संस्थाही परतल्या होत्या. पण ठिकठिकाणी राजरोसपणे बसलेल्या कुत्र्यांची दहशत, त्यांचा वाढलेला वावर पाहता भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत होती. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक नगरसेवकांनी याबद्दल तक्रारी केल्या होत्या. लॉकडाउनमध्ये कुत्र्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता असल्याने पुन्हा एकदा पशुवैद्यकीय विभागासाठी महापालिकेने ई-निविदा मागवल्या. त्यात एसपीए उदगीर लातूर संस्था, ऍनिमल वेलफेयर असोसिएशन्स मुंबई आणि जेनीस्मिथ संस्था, सातारा या तीन संस्थांनी सहभाग घेतला. या तीन संस्थेला निर्बीजीकरण शस्त्रक्रियांचे काम सोपवले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही करणार कामे

या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनीच कुत्र्यांना पकडायचे, पिंजऱ्यात टाकून न्यायचे, त्यांचे निर्बीजीकरण करायचे, ऑपरेशन झाल्याची खूण करून, त्यांना खाऊ-पिऊ घालून बरे केल्यानंतर पुन्हा त्या भागात नेऊन सोडायचे, अशी कामे करायची आहेत. एकाच्या निर्बीजीकरणाच्या मागे 693 रुपये अंदाजे इतका खर्च अपेक्षित आहे.

निर्बीजीकरण केंद्र सुरू झाल्याने भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळेल, असे अनेकांना वाटते. नागरिकांच्या तक्रारींनुसार भटक्‍या कुत्र्यांना पकडण्यासाठी हे कर्मचारी जाणार आहेत. त्यामुळे या संस्थांनी परिसरातल्या कुत्र्यांवर लक्ष केंद्रित केल्याने महिनाभरापासून थांबविलेल्या कामाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती पशूवैद्यकिय अधिकारी डॉ. अरूण दगडे यांनी दिली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकडे बोलतात

- 90 हजार भटकी कुत्री

- 7 हजार 89 श्‍वानदंश

- 7 हजार कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया

- एसपीए उदगीर संस्था, ऍनिमल वेलफेयर असोसिएशन्स मुंबई आणि जेनीस्मिथ संस्था, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT