पिंपरी-चिंचवड

पुणे : आता विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार प्रमाणपत्रे

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळणार आहे. याबाबतची सुविधा मावळ तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तहसीलदार कार्यालय, महा-ई-सेवा सेतू केंद्र येथे प्रामुख्याने उत्पन्नाचे दाखले, 
वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आणि विविध प्रकारच्या जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना घरबसल्या वेबसाईटवर ऑनलाइन दाखले देण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. नागरिकांनी https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर त्यांचे ई-मेल आयडीवर डिजिटल स्वाक्षरी युक्त प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.

प्रमाणपत्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे -

१) उत्पन्नाचे प्रमाणपत्र - विहीत नमुन्यातील अर्ज, गाव कामगार तलाठी यांचा उत्पन्न बाबीचा  अहवाल, रहिवासी पुरावा, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, लाईट बिल, कर पावती झेरॉक्स प्रत, शेती करत असल्यास चालू वर्षाचा सातबारा उतारा व आठ अ चा उतारा, अर्जदार नोकरदार असल्यास पगाराचे प्रमाणपत्र/आयकर विवरणपत्र, अर्जदार व्यवसायिक असल्यास आयकर विवरण पत्र, अर्जदार निवृत्तीवेतनधारक असल्यास त्यांचे बँक पासबुक/ पेन्शन पेमेंट ऑर्डर, आयकर विवरणपत्र, आधार कार्ड.

२) वय, अधिवास राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र - विहित नमुन्यातील अर्ज, स्व-घोषणापत्र,  अर्जदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेत शिकत असल्यास शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, अर्जदार यांच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्ममृत्यू नोंदीचा उतारा, शासकीय निमशासकीय नोकरीत असल्यास सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानांची संबंधित कार्यालयाने छायांकित केलेली प्रत व अर्जदार परराज्यातून परजिल्ह्यातून स्थलांतरित झाला असल्यास त्याचा मूळ राज्यातील जिल्ह्यातील सक्षम प्राधिकारी यांनी अर्जदार यांच्या वडिलांना दिलेला दाखला, रहिवासी पुरावा म्हणून शिधापत्रिकेची प्रमाणित परत, विवाहित स्त्रीयांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला किंवा राजपत्रात प्रसिद्ध झालेला नावाची बदल किंवा लग्न पत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला पंधरा वर्षे महाराष्ट्र राज्यात राहत असल्याबाबतचा पुरावा लाईट बिल किंवा कर पावती आधार कार्ड.

३) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र - विहीत नमुन्यातील अर्ज, घोषणापत्र, फोटो, लाभार्थ्यांचे वडिलांचे जात प्रमाणपत्र, तीन वर्षाचे तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आयकर भरत असल्यास मागील तीन वर्षाचे आयकर विवरणपत्र, रेशनिंग कार्ड, आधार कार्ड.

४) जात प्रमाणपत्र - लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, मावळ येथील जात नमूद पुरावा, अनुसूचित जाती जमाती सन १९५०, इतर मागासवर्गीय १९६७, विमुक्त जाती व भटक्या जमाती १९६१ व विशेष मागास प्रवर्ग १९९५ किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या अर्जदार यांचे वडील आणि भाऊ-बहीण, आजोबा, चुलते आत्या किंवा इतर रक्त नातेसंबंधातील व्यक्तीची जात नमूद असलेला पुरावा, रेशनिंग कार्ड, आधार कार्ड

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT