pcmc 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये बाधितांची संख्या दोनशेवर; पाच जणांना मिळाला डिस्चार्ज 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात बुधवारपर्यंत दाखल कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या दोनशेवर पोचली आहे. यात शहरातील 179 आणि पुण्यातील 22 अशा 201 रुग्णांचा समावेश आहे. आज पाच जण पॉझिटिव्ह आढळले असून चौदा दिवस उपचार घेऊन बरे झालेल्या पाच जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. 

महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. यात शहरातील रहिवाशांसह शहराबाहेरील रुग्णांचाही समावेश आहे. शहरात 11 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. आज ही संख्या दोनशेपर्यंत पोचली आहे. शिवाय, शहरातील रहिवासी मात्र पुण्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या 11 आहे. त्यातील तीन जण आजपर्यंत बरे झाले आहेत. सध्या शहरातील 179 पैकी 116 जण बरे होऊन घरी गेले असून 59 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत चार जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच, पुण्यातील रहिवासी मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये उपचार घेणाऱ्या 22 पैकी सात जण बरे होऊन घरी गेलेले आहेत. सध्या दहा जणांवर उपचार सुरू असून आजपर्यंत पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

औंध रुग्णालयात एकूण 43 
सांगवीतील औंध जिल्हा रुग्णालयात सध्या 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे आजपर्यंत 43 रुग्ण दाखल झाले आहेत. त्यातील तीन जणांचा मृत्यू झालेला असून 28 जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या चार रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT