YCM-Hospital sakal
पिंपरी-चिंचवड

YCM Hospital : ‘वायसीएम’मध्ये होणार नर्सिंग महाविद्यालय

पिंपरी महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) बीएससी नर्सिंग महाविद्यालय आणि पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करण्यास राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) बीएससी नर्सिंग महाविद्यालय आणि पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करण्यास राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णसेवाकरिता त्याची मदत होणार आहे. याशिवाय शहर आणि शहराबाहेरील विद्यार्थ्यांना अल्प दरात नर्सिंग शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

शहरातील वैद्यकीय सुविधा आणखी बळकट करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने ‘वायसीएम’मध्ये नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याचा महापालिकेचा मानस होता. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता.

या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाली असून रुग्णालयाच्या आवारात ११ मजली नवीन इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या व सहाव्या मजल्यावर नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. बी.एस.सी. नर्सिंगकरिता ६० विद्यार्थ्यांची भरती प्रस्तावित आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असल्याने चारही वर्षाचे मिळून एकत्रित २४० विद्यार्थी शुश्रूषा सेवेमध्ये हातभार लावतील किंवा भाग घेतील.

तसेच इतर पॅरामेडिकल कोर्सेस (बीपीएमटी, पीजीडीएमएलटी) पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास ३०० ते ४०० प्रशिक्षणार्थी विविध विभागांच्या कामकाजाकरिता उपलब्ध होणार आहेत. तसेच या नर्सिंग महाविद्यालयासाठी विविध संवर्गातील २४ पदांची निर्मितीही करण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बीएससी नर्सिंग कॉलेज व पॅरामेडिकल कोर्सेस सुरू झाल्यानंतर वायसीएम रुग्णालयामध्ये शुश्रूषा विभाग व इतर विभागांच्या कामकाजात मदत होणार आहे. पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाशी संलग्नित बीएससी नर्सिंग कॉलेज व पॅरामेडिकल कोर्सेस वायसीएम रुग्णालयात सुरू करून पालिकेमार्फत दिली जाणारी रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यात हातभार लागणार आहे.

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी

बीएससी नर्सिंग महाविद्यालय तसेच पॅरामेडिकल कोर्सेस सुरू झाल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच अल्प दरात पॅरामेडिकल शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यातही शहरातील वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येणार असून शहरवासीयांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT