Sarita Kachi sakal
पिंपरी-चिंचवड

Women Strike : व्यावसायिक बांधकामावर कारवाई; राडारोडा उचलण्याच्या मागणीसाठी महिलेचे बेमुदत उपोषण

जुनी सांगवी येथील प्रियदर्शनी नगर येथे महापालिकेकडून २०१८ मध्ये एका व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात आली होती.

रमेश मोरे

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील प्रियदर्शनी नगर येथे महापालिकेकडून २०१८ मध्ये एका व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. त्याचा अर्धवट राहिलेला राडारोडा महापालिकेने उचलण्यात यावा यासाठी गेली पाच दिवसांपासून येथील सरिता ज्ञानोबा काची या उपोषणास बसल्या आहेत. उपोषणाचा मंगळवार ता.६ सहावा दिवस असून पालिका प्रशासनाने याबाबत कार्यवाही करावी अशी उपोषणकर्त्या सरिता काची यांची मागणी आहे.

प्रियदर्शनी नगर येथील भाऊबंदकीच्या वहिवाटीच्या वादातील या बांधकामावर २०१८ मध्ये पालिकेने कारवाई केली होती. या जागेवर घर दोन बॅंकांचे एटीएम केंद्रे, एक हॉटेल, व गाळे असे व्यावसायिक बांधकाम होते. सरिता काची या सलग सहा वर्षे रस्ता वहिवाटीसाठी न्यायालयीन लढा देत होत्या. काची यांच्या जागेसमोर भाऊबंदकीने तीन हजार स्क्वेअर फूट जागेत घर व व्यावसायिक बांधकाम केल्याची त्यांची न्यायालयात तक्रार होती.

काची यांना रस्ता नसल्याने सातबारावर खोट्या नोंदी लावून मुळ १६७० स्क्वे. फूट जागेवर ३ हजार स्क्वेअर फूट जागा लावल्याची तक्रार घेऊन जिल्हा न्यायालयात व उच्च न्यायालयात त्या दाद मागत होत्या. यावरील न्यायालयीन आदेशानुसार येथील व्यावसायिक बांधकामावर कारवाई करून हे बांधकाम महापालिकेकडून काढून टाकण्यात आले होते. सद्यस्थितीत येथील राडारोडा काढुन टाकण्याच्या मागणीसाठी सरिता काची या गेली पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत.

महापालिकेकडून अर्धवट कारवाई करण्यात आली.माझ्या मुख्य दरवाजातील व ड्रेनेजलाईनवरील राडारोडा २०१८ पासून तसाच पडून आहे. याबाबत मी प्रशासनाकडे आजवर एकुण १०३५ तक्रार अर्ज केलेले आहेत. न्याय मागण्यासाठी मी बेमुदत उपोषणाला बसले आहे.

- सरिता काची, रहिवासी, जुनी सांगवी.

हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यास महापालिकेकडून उचित कार्यवाही करण्यात येईल. तसे संबंधितांना कळविले आहे.सबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली आहे.

- उमेश ढाकणे 'ह' क्षेत्रिय अधिकारी पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची लाट ! गोंदियाने महाबळेश्वरलाही टाकले मागे ; राज्यातील इतर भागांत कसे आहे हवामान? जाणून घ्या

Yeola News : जीवघेणा नायलॉन मांजा! येवल्यात युवकाचा गळा चिरला, श्वासनलिकेला गंभीर दुखापत

Latest Marathi News Live Update : इंडिगो प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही- मुरलीधर मोहोळ

इंडिगोतील गोंधळाचा फटका आमदारांनाही, नागपूरला अधिवेशानासाठी जाणाऱ्यांचं तिकीट रद्द; विमानतळावरही मोठा गोंधळ...

Mango Alphonso : सगळ्या जगाला माहितीय हापूस कोकणाचा आहे, पण गुजरात म्हणतं हापूस आमचा..., आंबा बागायतदार लढा देणार

SCROLL FOR NEXT