पिंपरी - पुर्नविक्रीसाठी ठेवलेल्या लाखो रुपये किमतीच्या जुन्या वाहनांची अवस्था देखभाल-दुरुस्तीअभावी दयनीय झाली आहे. धुळीचा थर साचलेली, पंक्चर झालेली तब्बल 15 हजार वाहने लॉकडाऊनमुळे पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत उन्हात विक्रीविना पडून आहेत. या व्यवसायावर निर्भर असलेल्या वित्त व विमा कंपन्या, ट्रेडिंग कंपन्यांसह जुन्या वाहन व्यावसायिकांचे चक्र पूर्णत: कोलमडले आहे. एरव्ही दररोज मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या या व्यवसायात प्रथमच मंदीचे सावट आल्याने जुन्या वाहनांचे मार्केट डाउन झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहरात जुन्या वाहनांची (रिसेल) विक्री करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहेत. जुन्या वाहनांचा विक्री व्यवसाय पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांवर एकूणच वाहन विक्रीची कुऱ्हाड कोसळली आहे. एक वर्षाच्या करार तत्त्वावर ऑनलाइन कंपनीसोबत या व्यावसायिकांनी वाहन विक्रीसाठी करार केलेले आहेत. याशिवाय जुन्या वाहनांच्या खपासाठी व्यावसायिकांनी स्वतंत्र ऍप देखील विकसित केले आहेत. तर काहींनी थेट गुगल कंपनी व सोशल मीडियासोबत करार केलेले आहेत. जवळपास एका व्यावसायिकाने या व्यवसायात तब्बल लाखोंरुपयांत गुंतवणूक एका वाहनापाठीमागे केलेली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांचे विविध सेल्स कंपन्यांकडे पैसे अडकून पडलेले आहेत. याशिवाय व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर असलेल्या जागा व मनुष्यबळाचा खर्च वेगळा आहे.
गुढीपाडवा व अक्षयतृतीया हे मोक्याचे वाहन विक्रीचे मुहूर्तच हुकल्याने या उलाढालीला व्यावसायिकांना मुकावे लागले आहे. त्यामुळे एकूणच या व्यवसायावर निर्भर असलेले वाहन विक्रेते, रिसेल डीलर, वित्त व विमा कंपन्या तसेच ऑनलाइन कंपन्यांच्या प्रत्येकी दोन टक्के कमिशनवर पाणी फिरले आहे.
जुन्या वाहनांच्या किमतीमध्ये देखील बाजारभावाप्रमाणे वारंवार चढ-उतार होत आहेत. मात्र, ज्या किमतीला वाहने विक्रीसाठी घेतली गेली त्या मूळ किमती आता मार्केट डाउन असल्याने वसूल होणार नाहीत, हा मोठा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा आहे. प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशी वाहने विक्रीसाठी आहेत. काही जणांनी लॉकडाउनपूर्वी नवीन कार खरेदी करावयाची आहे म्हणून वाहन विकले आहे तर काहींनी आर्थिक अडचण व मेटेंनन्सच्या त्रासामुळे वाहन विकलेले आहे.
आरटीओकडूनही काम ठप्प -
अशी घ्यावी लागते वाहनांची काळजी -
आमच्या व्यवसायाला लवकरात लवकर चालना मिळणे गरजेचे आहे. बरेच व्यावसायिक चाळीस वर्षापासून या व्यवसायात आहेत. वाहनांचे डिपॉझिटही वसूल होईल की नाही ही भीती आहे.
- सचिन साकोरे, उपाध्यक्ष, युज्ड कार डीलर असोसिएशन, पुणे (युसीडीएपी),
जुन्या वाहन खरेदीचा बाजार पुन्हा एकदा जोमाने उभा राहण्याची आशा आम्हा व्यावसायिकांना आहे. कारण मंदीमुळे ग्राहक जुन्या वाहन खरेदीला प्राधान्य देईल. त्याचप्रमाणे ग्राहकाने वाहन खरेदीचे पूर्वीचे प्लॅन केले असतील तर तो नक्कीच केलेली बचत वाहन खरेदीसाठी वापरेल.
- राजेंद्र चेडे, सदस्य, युज्ड कार डीलर असोसिएशन, पिंपरी-चिंचवड, (युसीडीएपी).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.