पिंपरी-चिंचवड

चोरट्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी; निगडीतील घटना

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : एकट्या राहत असलेल्या वृद्ध महिलेच्या घरात घुसून चोरट्यानी दागिने लंपास केले. यावेळी वृद्धावर केलेल्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना निगडी प्राधिकरणातील सेक्टर 24 येथे घडली. 

हेमलता पाटील (वय 75, रा. एमएसईबी ऑफिसशेजारी, सेक्टर 24, प्राधिकरण, निगडी) असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पाटील या येथे एकट्याच राहतात. त्यांना एक विवाहित मुलगी असून, ती आकुर्डीत राहते. सोमवारी रात्री पाटील घरात एकट्याच असताना अज्ञात चोरटे घरात शिरले. त्यांना मारहाण करीत घरातील दागिने व रोकड चोरून तेथून पसार झाले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत त्यांच्या मुलीला माहिती मिळाल्यानंतर पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. निगडी पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असून, नेमका किती ऐवज चोरीला गेला याबाबतचाही तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

सार्वजनिक स्वच्छतागृहात अल्पवयीन तरुणांची नशापार्टी, ड्रग्सचा डबल डोस घेताच १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; चक्रावणारा व्हिडिओ Viral

‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बरोबर!’ किरण राव यांचं मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या...

PM Kisan Scheme for Women Farmers : महिला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' अटी पूर्ण केल्यास खात्यात जमा होणार वार्षिक 6 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता आणि नियम

SCROLL FOR NEXT