पिंपरी-चिंचवड

पोलिसांनी फक्त मास्क का लावला नाही एवढंच विचारलं, पण त्याने थेट...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : तोंडाला मास्क न लावता दुचाकीवरून भरधाव वेगात जाणाऱ्या दोघांना थांबविल्याच्या रागातून दोघांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केली. ही घटना हिंजवडी येथे घडली. 

सुधीर महेंद्र गोस्वामी (वय 34, रा. खेसे पार्क, धानोरी), कैलास काशिनाथ कलशेट्टी (वय 33, रा. कस्पटेवस्ती, वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल जनार्दन बनसोडे (वय 34) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत असून, रविवारी (ता. 5) सायंकाळी सहाच्या सुमारास ते हिंजवडीतील फेज एककडून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक नियमन करीत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, दुचाकीवरून एकाच व्यक्तीस प्रवासाची परवानगी असताना दोघे आरोपी तोंडाला मास्क न लावता दुचाकीवरून फेज एककडून शिवाजी चौकाकडे विरुद्ध दिशेने जात होते. त्यावेळी फिर्यादीने त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते न थांबता निघून जाऊ लागले. दरम्यान, फिर्यादीने त्यांची दुचाकी अडवून विचारणा केली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या डोक्‍याला दुखापत झाली. आरोपींवर हिंजवडी पोलिस ठाण्यात मारहाण व शासकीय अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, दोघांनाही अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

आई, बहीण अन् भाच्याचा गळा चिरला, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न; चिटफंडच्या कर्जाचा डोंगर अन् बहिणीच्या आजारपणामुळे टोकाचा निर्णय

Manchar Tax Dues: मंचर नगरपंचायतीची ४.८४ कोटींची कर थकबाकी; घरपट्टी–पाणीपट्टी न भरल्यास जप्ती व लिलावाची कारवाई

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

MPSC Agriculture Officers: अवसरी बुद्रुकच्या शेतकरी कुटुंबातील तेजश्री व अक्षय हिंगे दांपत्याची कृषी विभागात अधिकाऱ्यपदी चमकदार कामगिरी

SCROLL FOR NEXT