पिंपरी-चिंचवड

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 'या' नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजाराचा दंड फिक्स

भाऊ म्हाळसकर

लोणावळा (पुणे) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सुसाट जाणाऱ्या वाहनचालकांना आता चाप बसणार आहे. द्रुतगती मार्गावर सुसाट गाडी चालविल्यास आणि दोन टोलनाक्यांमधील ५० किलोमीटर अंतर ३७ मिनिटांत पूर्ण केल्यास वाहनचालकांना आता एक हजार रुपयांचा दंड बसणार आहे.

द्रुतगती मार्गावर अपघातांची सरासरी सध्या जरी कमी झाली असली, तरी सर्वाधिक अपघात हे अतिवेगामुळे होत असल्याचा निष्कर्ष आहे. राज्यातील अपघातांची संख्या तसेच, मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान, नोव्हेंबर २०१९ मध्ये महामंडळाच्या वतीने अधिसूचना काढत पुणे-मुंबई दरम्यान ९४ किलोमीटर लांबीच्या मार्गावर वेगमर्यादा वाढविण्यात आली. हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किलोमीटर व अवजड वाहनांसाठी ८० किमी प्रति तास वेग मर्यादा निश्चित करण्यात आली. तर बोरघाटात १५ किमी रस्त्यांसाठी ताशी ५० इतकी वेगमर्यादा आहे. मात्र, तरीही चालक वेग मर्यादेचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता खालापूर ते उर्से टोल नाक्यादरम्यानच्या अंतरावर महामार्ग पोलिसांची करडी नजर असेल. महामार्ग पोलिस आणि रस्ते विकास महामंडळाच्या वतीने वेगमर्यादा वाढविण्यात आली असली, तरी दुसरीकडे द्रुतगती मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडाची पावती फाटणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फास्ट टॅगच्या आधारे होणार कारवाई

फास्ट टॅगच्या आधारे ही कारवाई करण्यात येणार आहे.  फास्ट टॅगची सुविधा ही थेट बँक खात्याशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे वेग मर्यादा ओलांडलेल्या वाहनांना थांबवण्याची गरज भासणार नाही. येत्या एक ऑगस्टपासून कारवाई सुरू करण्यात येणार होती. मात्र, अद्याप तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. प्रवास करणाऱ्या सर्वच वाहनांकडे फास्ट टॅग सुविधा नाही. टोल नाक्यांवर वाहनांच्या नंबर प्लेट स्कॅनर, कॅमेरा बसविण्यात येणार असून, तांत्रिक पूर्तता झाल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल, अशी माहिती महामार्ग सुरक्षा विभागाचे सहाय्यक निरीक्षक अनिल हगवणे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दंडाची रक्कम दुप्पट होणार 

ई-चलनाद्वारे हा दंड आकारण्यात येणार आहे. नियमानुसार प्रथम हा गुन्हा केल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास दंडाची रक्कम दुप्पट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहकार्य

महामार्ग पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात येणार असून, रस्ते विकास महामंडळाच्या वतीने त्यासाठी लागणारी सर्व तांत्रिक माहिती वाहतूक पोलिसांना देण्यात येणार आहे, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता दिलीप उर्किर्डे यांनी दिली.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांमध्ये फूट! मोठ्या पक्षाने ९ वर्षांची साथ सोडत युती तोडली; राजकीय गणित बिघडले

SCROLL FOR NEXT