पिंपरी-चिंचवड

गणेशोत्सवाबाबत वडगाव मावळात नगराध्यक्षांनी केलं 'हे' मोठं आवाहन

ज्ञानेश्वर वाघमारे

वडगाव मावळ (पुणे) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जावा, या राज्य सरकारच्या आवाहनानुसार शहरात 'एक गाव एक गणपती' उपक्रम राबविण्याचे आवाहन नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी मंडळांना केले आहे. 

नगरपंचायतीच्या वतीने ढोरे यांनी केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, दरवर्षी आपण गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्‍यात साजरा करीत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून, प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वांनाच बंधने घालावी लागणार आहेत. कोरोना महामारीचे संकट टळलेले नाही अशा परिस्थितीत सर्व प्रमुख गणेश मंडळांनी जबाबदारीची जाणीव ठेवून शहराला महामारीतून सुरक्षित ठेवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलणे खूप गरजेचे आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'श्रीं'चे दर्शन व देखावे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत असतात व हीच गर्दी शहराला महामारीच्या संकटात ओढू शकते. यासाठी यंदा आपण "एक गाव एक गणपती"ही संकल्पना शहरात राबवण्यासाठी एक पाऊल उचलू या. गणपती बाप्पा आपल्या सर्वांना या महामारीतून बाहेर काढेल हा विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील व ते आपण निश्‍चित करू. 

असा करता येईल गणेशोत्सव 
- पोटोबा महाराजांचा मानाचा पहिला गणपती प्रतिष्ठापित होईल 
- मंडळांनी मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करू नये 
- लहान मूर्तींची प्रतिष्ठापना नगरपंचायतीच्या मंडपात करावी 
- प्रत्येक मंडळाच्या दोन सदस्यांनी आपल्या "श्रीं'च्या आरतीला यावे 
- मंडपाजवळ सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व मंडळांनी एकी दाखवून समाजापुढे आदर्श ठेवण्याची हीच वेळ आहे. गणेशोत्सव साजरा होत असताना रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, कोव्हिड-19 ची चाचणी आदी विधायक उपक्रमही या ठिकाणी राबवू शकतो. 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबवून शहराला सुरक्षित ठेवू या. 
- मयूर ढोरे, नगराध्यक्ष वडगाव नगर पंचायत 

कोरोनाचे संकट लक्षात घेऊन नगराध्यक्षांनी मांडलेली 'एक गाव एक गणपती'ची संकल्पना अतिशय स्वागतार्ह आहे. आमचा मंडळ यात निश्‍चित सहभागी होईल. इतर मंडळांनी सहभागी व्हावे.
- गणेश अप्पा ढोरे, संस्थापक, गणेश तरुण मंडळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT