online fraud Sakal
पिंपरी-चिंचवड

Online Fraud : पोलिस उपायुक्तांच्या नावाने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची साडेनऊ लाखांची ऑनलाईन फसवणूक

सायबर क्राईममधून पोलिस उपायुक्त बोलत असल्याचे खोटे सांगून सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची साडेनऊ लाखांची ऑनलाईन फसवणूक केली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - सायबर क्राईममधून पोलिस उपायुक्त बोलत असल्याचे खोटे सांगून सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची साडेनऊ लाखांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार निगडी, प्राधिकरण येथे घडला.

याप्रकरणी निगडी प्राधिकरण येथील २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांना फोन करून आपण फेडिक्स कुरियर कंपनीतून बोलत असून तुमच्या नावाचे मुंबई येथून तैवान करिता बेकायदेशीररित्या पार्सल जात असल्याचे सांगितले. त्यानंतर तो फोन दुसऱ्या व्यक्तीला जोडून दिला. त्यावर समोरील व्यक्तीने मी सायबर क्राईममधून पोलिस उपायुक्त (डीसीपी) अजयकुमार बन्सल बोलत असल्याची खोटी ओळख निर्माण केली.

फिर्यादीच्या बँक खात्याच्या डिटेल्स घेत त्यांच्या एसकेवायपीई अप्लिकेशनचा आयडी मागवला. त्यानंतर आयसीआयसीआय बँक खात्यातून इंलिगल ट्रान्झेक्शनचा प्रयत्न होत असून आपल्या बँक खात्यातील पैसे दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर आरबीआय बँकेचा खाते क्रमांक देवून त्यावर फिर्यादीस तीन ट्रान्झेक्शन करायला लावून फिर्यादीची ऑनलाईन तांत्रिक पद्धतीने नऊ लाख ६० हजार ९९९ रुपयांची फसवणूक केली.

आणखी एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला गंडा

हिंजवडीतील फेज दोन येथे राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीचीही तब्बल २० लाख १६ हजारांची ऑनलाईन फसवणूक झाली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना टास्क देण्याच्या कारणावरून फिर्यादीकडून वेळोवेळी युपीआय आयडी व बँक खात्यावरून २० लाख १६ हजार ८५६ रुपये ऑनलाइनद्वारे उकळले. त्यानंतर कोणताही मोबदला न देता फसवणूक करून या रकमेचा अपहार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT