online fraud share market 50 crore transactions on various bank accounts two arrested Sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Online Fraud : ऑनलाइन फसवणूक; विविध बँक खात्यांवर तब्बल ५० कोटींचे व्यवहार, दोघे अटकेत

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाऱ्या दोन जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाऱ्या दोन जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने बेड्या ठोकल्या आहेत.

तक्रारदार महिलेने ज्या अकरा बँक खात्यावर पैसे भरले; त्या बँक खात्यावर तब्बल पन्नास कोटींपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पैसे भरलेली दोन बँक खाती आरोपींची असून इतर बँक खात्यांबाबत तपास सुरु आहे. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध इतर राज्यांतही वीस तक्रारी प्राप्त झाल्याचे समोर आले आहे.

विकास नेमिनाथ चव्हाण (वय ४३, रा. गणेशनगर, नवी सांगवी) व प्रदीप कृष्णा लाड (वय ३२, रा. पिंपळे गुरव, सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींचा नावे आहेत. वाकड येथील महिला ही फेसबुकवर गुंतवणुकीसंदर्भात आयबीकेआर क्रिसेट अॅकेडमी गोल्डमन सॅच्चस व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन झाली.

पैसे गुंतवणूक करण्यासाठी महिलेला व्हॉट्सॲपद्वारे फॉर्म भरण्यास सांगितले. त्यानंतर, महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यावेळी आरोपींनी तक्रारदार महिलेला आयबीकेआर ॲपची लिंक पाठवून ते ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. या ॲपवर भरलेले पैसे व झालेला नफा दिसत होता.

मात्र, पैसे काढता येत नव्हते. अशाप्रकारे महिलेला आयबीकेआर क्रिसेट अॅकेडमी गोल्डमन सॅच्चस या कंपनीत पैसे गुंतविण्यास लावून दहा लाख ६९ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तपास सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

रितेश देशमुखची शाळा पाहिलीत का? ना मुंबई, ना लातूर; 'या' ठिकाणी शिकलाय अभिनेता, मैदान पाहाल तर पाहतच राहाल

Latest Marathi News Updates : पंजाबच्या पुरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

Sillod Rain : तीन तासाच्या पावसाने सर्वत्र दाणादाण; आमठाणा मंडळात 70 मिलिमीटर पाऊस, नऊ गावांचा काही तासासाठी तुटला संपर्क

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

SCROLL FOR NEXT