bullock cart sakal
पिंपरी-चिंचवड

बैलगाडा शर्यत न्यायालयीन अंतिम लढ्यासाठी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती कायमस्वरुपी सुरू राहाव्यात. याकरिता अद्यापही न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती कायमस्वरुपी सुरू राहाव्यात. याकरिता अद्यापही न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे.

पिंपरी - महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती कायमस्वरुपी सुरू राहाव्यात. याकरिता अद्यापही न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि बैलगाडा संघटना प्रतिनिधी यांची पुण्यातील विधान भवन येथे महत्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक दि. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुढाकाराने होणाऱ्या बैठकीला भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, बैलगाडा संघटना प्रतिनिधी, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्वोच्च न्यायलयातील याचिकेच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संदीप बोदगे म्हणाले की, देशभरातील बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंतिरीम आदेश दिले होते. मात्र, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींवर बंदी होती. त्यामुळे अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील शर्यती सुरू करण्याबाबत न्यायालयाला विनंती केली होती. त्यामध्ये बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यात आली होती. तसेच, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी होईल, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आता देशातील बैलगाडा शर्यंतींबाबत दि.२३ नोव्हेंबर २०२२ रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. त्यादृष्टीने पूर्वतयारीसाठी राज्य शासनाकडे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मागणी केली होती. त्याअनुशंगाने मंत्री विखे-पाटील यांनी बैठकीचे नियोजन केले आहे.

देशातील बैलगाडा शर्यतींवर मे २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. त्यापूर्वी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने २०११ मध्ये बैलगाडा शर्यंतींवर बंदी घातली होती. त्यावेळीपासून न्यायालयीन लढा सुरू झाला. डिसेंबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायलयाने काही अटींवर बैलगाडा शर्यंतीना परवानगी दिली. शर्यती सुरू झाल्या असल्या तरी संबंधित याचिकेवर अंतिम सुनावणी होणार आहे. निश्‍चितपणे शेतकरी आणि बैलगाडा प्रेमींच्या बाजुनेच न्यायदेवतेचा कौल राहील.

- महेश लांडगे, शहराध्यक्ष व आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT