पिंपरी-चिंचवड

मावळात 'आयले पहिले गणीचे देवा...' गाण्याचे स्वर सुरू, कारण...

सकाळवृत्तसेवा

कामशेत : आयले पहिले गणीचे देवा! आदी खेळ मांडू मग तुझी सेवा! खेळ मांडीला येशीच्या दारी! आमचा भैरोबा देवाचा खेळ! खेळता बोलता लागली तान! अशी भलरीची गाणी आम्ही आदिवासी मंडळी पडकईत गाऊन भैरोबा देवाचे गुण गात आहोत, असे माळेगाव खुर्दचे भलरी गायक चहादू कोकाटे सांगत होते.

अश्विन महिन्यात देवघट्टी बसवतात, याच दरम्यान नाचणी, सावा, वरईची बेणणी होते. एकीकडे बेणणीत पिकांचे तण काढायचे दुसरीकडे आपल्या आराध्य देवाला साद घालीत. स्त्रीशक्तीचा सन्मान वाढण्यासाठी भलरीची गाणी गायची ही आमची पिढीजात परंपरा आहे, तिची आम्ही जपणूक करतो असे बबन भागीत, विष्णू गवारी, आबाजी भागीत, काळू सुपे, संजय दाते हे सांगत होते.

लाल मातीची शिवारे नाचणी, सावा, वरईच्या पिकांसाठी अत्यंत पोषक आहे. या भागात पावसाचा जोर मोठा असतो. डोंगर उताराच्या रानात ही पिके चांगली वाढतात. सध्या या पिकांच्या लावण्याचे प्रमाण घटते आहे. त्यांचा पारंपरिक परंपरेला काहीच परिणाम झाला नाही. वाडवडिलांनी लावून दिलेली जुनी रीत कशी मोडायची असं चिंगुबाई ताते, शैला बोऱ्हाडे, यमुना लांघी, इंदिरा वासावे सांगत होत्या.

गणीचे देवा म्हणजे समुहांच्या टोळ्यांचा प्रमुख. येशीच्या दारी म्हणजे गावाची हद्द भैरोबा देव म्हणजे आदिवासीचे आराध्या स्थान. ईरजाई राणी म्हणजे गणाची पत्नी. ईराची म्हजे गणाप्रमुखाची बायको, अन् गण म्हटले तर गावचा मुखिया याही शब्दांचा अर्थ जनाबाई लांघी सांगत होत्या.

आंदर मावळ, नाणे मावळ आणि पवनमावळाच्या पश्चिम भागात नाचणी, सावा, वरईची भाकरी करणारी पिके घेतली जातात. या धान्याची पौष्टिकता मोठी. याला कष्टही फारच. एकट्या दुकटया शेतकऱ्याचे हे काम नाही, त्याला पडकई करावी लागत होती. या पडकईत गावातील सगळ्या जाती धर्माच्या माणसांचा सहभाग असायचा आणि समूहाने ही शेती केली जायची, काळाच्या ओघात ही पिके घटली, पडकईची परंपरा अजूनही टिकून असल्याची स्पष्टोक्ती ग्रामपंचायत सदस्य भाऊ बो-हाडे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रायगडमध्ये मतदारांनी मतदानानंतर केलं रक्तदान..

SCROLL FOR NEXT