पिंपरी-चिंचवड

ऐंशी फूट उंच अडकलेल्या 'या' छोट्या जिवासाठी अग्निशमन दलाचे सुरू होते प्रयत्न, अन् शेवटी...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राहटणीतील लक्ष्मी हाउसिंग येथे मांजाच्या दोऱ्यात 80 फुटांवर पोपट अडकून पडला होता. अग्निशमन दलाला परिसरातील नागरिकांनी माहिती दिल्यानंतर काही क्षणात पोपटाची सुटका करण्यात आली.

मंगळवारी (ता.७) सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली. राहटणी व पिंपरी अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळून पोपटाला वाचवले. 54 मीटर हायड्रोलिक प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने जवानांनी पोपटाला खाली घेतले. त्यांनतर त्याला पाणी पाजले. पोपटाच्या वेदनेने परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करत होते. सुदैवाने गळ्याभोवती मांजा न आवळल्याने पोपटाचे प्राण वाचले. एम. ए. कुंभार ही प्राणी प्रेमी महिलाही पोपटाचे प्राण वाचविण्यासाठी धावून आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमोल चिपळूणकर, मयूर कुंभार, मुकेश बर्वे, रुपेश जाधव, विक्रम कदम या जवानांनी ही मोहिम फत्ते केली. नागरिकांनी कृपया प्राणी किंवा पक्षी अडकल्यास अग्निशमन दलाला कळवावे. पक्ष्यांचा मुक्त संचार व्हावा, यासाठी मांजाचा वापर करू नये तो टाळावा, असे अग्निशमन दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT