पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची रेबीज लशीसाठी धावपळ 

आशा साळवी

पिंपरी : श्‍वानदंश झालेल्या रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार मिळतात. मात्र, आता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) केवळ कोविड रुग्णांवरच उपचार होत आहेत. त्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयांत दोन हजारांचा भुर्दंड बसत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात दररोज कुत्रा चावण्याच्या दोन ते तीन घटना घडत आहेत. या रुग्णांवर उपचारासाठी महापालिकेच्या सगळ्याच रुग्णालयांत रेबीजची लस उपलब्ध आहे. मात्र, खासगी रुग्णालयात या लससाठी एका वेळेस 500 रुपये मोजावे लागतात. लसीचे चार डोस पूर्ण करावे लागतात. त्यामुळे रुग्णांना दोन हजार रुपयांचा खर्च येतो. सध्या वेगवेगळ्या टप्प्यातील रुग्णांसाठी महापालिकेच्या रुग्णालयात 800 डोस महिन्याला देण्यात येतात. आता वायसीएममध्ये उपचार मिळत नसल्याने लसीसाठीही थेट मेडिकलचा किंवा खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखविला जातो. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या सामान्य रुग्णांची परवड होत आहे. 

रेबीज म्हणजे काय? 
रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे माणसांना हा रोग होतो. प्रसंगी मानवी मज्जासंस्थेला संसर्ग होऊन मनुष्य दगावतो. तोंड, मान, छाती, हात या ठिकाणी कुत्रा चावला असेल, तर या रोगाचा प्रादुर्भाव त्वरित होतो. तोंडातून लाळ गळणे, कोणतीही वस्तू चावणे, घाबरणे, जेवण न करणे, नाडीचे ठोके वाढणे ही लक्षणे दिसून येतात. 

प्रतिबंधात्मक उपचार 
माणसाला कुत्रा चावल्यानंतर त्याला त्वरित अँटिरेबिज लस देणे फायद्याचे ठरते. चावलेला भाग पाणी आणि साबणाने स्वच्छ करावा, तसेच त्यावर पट्टी बांधू नये. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोकाट कुत्र्यांमुळे जखमी होणाऱ्या रुग्णांवर उपचाराची जबाबदारी ही महापालिकेची आहे. त्यांनी केवळ गंभीर रुग्णच खासगीकडे पाठविले पाहिजे. खासगी रुग्णालयातील खर्च सामान्यांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे कुत्र्यांपासून सावध राहावे लागणार आहे. 
- प्रमोद शिंदे, नागरिक 

सध्या वायसीएम रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णांवर उपचार करण्यात येत नाहीत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठीही काळजी घेण्यात येत आहे. 
- राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT