पिंपरी-चिंचवड

Video : पिंपरी-चिंचवडमधील मंडप व्यावसायिकांपुढे आता हे नवं संकट

अवधूत कुलकर्णी

पिंपरी : कोणतेही शुभ कार्य असले, की त्याची सुरुवात होते ती मंडपानेच. मात्र, कोरोनामुळे हा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे पुढचा सिझन येईपर्यंत अनेक व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. 

शुभ कार्यासह हॉटेलमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठीही मंडप उभारण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असते. लग्नानिमित्त अनेक जण घरासमोर तसेच कार्यालयाच्या परिसरातही मंडप उभारतात. हॉटेलमध्ये मुले, ज्येष्ठ नागरिक यांचे वाढदिवस साजरे करण्याचा 'ट्रेंड' आहे. त्यासाठीही मंडप उभारण्यात येतात. लग्नसराईत एका व्यावसायिकाची सरासरी उलाढाल 20 ते 25 लाख, गणेशोत्सवात चार ते पाच लाख तर नवरात्रोत्सवात दोन ते तीन लाख रुपयांच्या आसपास होत असते. पिंपरी-चिंचवड शहरात मोठी आर्थिक उलाढाल असणारे सुमारे 15 ते 20 व्यावसायिक आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा नेमका परिणाम 

कोरोनामुळे लग्न, वाढदिवस, हॉटेलमध्ये होणारे कार्यक्रम यासाठी मंडप उभारणे, तर बंदच आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात सुद्धा काही व्यवसाय झाला नाही, तर या व्यावसायिकांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

कामगारांची स्थिती 

या व्यवसायातील व्यावसायिकांच्या उत्पन्नापैकी 50 टक्‍क्‍यांहून जास्त खर्च हा कामगारांच्या वेतनावर होत असतो. बिगारी, मंडप उभारणारे, गवंडी, मुकादम, ड्रायव्हर, मॅनेजर असे घटक या व्यवसायात कार्यरत असतात. महिला बिगारींना 400, पुरुष बिगारींना 500 रुपये, मंडप उभारणाऱ्यास 750 रुपये, तर प्लॅस्टरचे काम करणाऱ्यास रोज एक हजार रुपये या प्रमाणे वेतन दिले जाते. साधारणपणे एका व्यावसायिकाकडे पाच कायमस्वरुपी कामगार असतात, तर उर्वरित हे कामाच्या दिवशी गरजेनुसार शहरातील मजूर अड्ड्यांवरुन बोलावून नेले जातात. कामाअभावी काही व्यावसायिकांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

व्यावसायिक काय म्हणतात 

गेली 30 वर्षे व्यवसाय करणारे आकुर्डी येथील भारत कोकरे यांनी सांगितले, "गेले तीन महिने काम नाही. त्यामुळे व्यवसायाची स्थिती बिकट आहे'' भोसरी येथील उमेश गावडे यांनी सांगितले, "कोरोनामुळे अनेक कामगार गावी निघून गेले आहेत. ज्यांची शेती आहे, ते म्हणतात आम्ही सध्या शेतीच करीत आहोत. मात्र, जे कामगार शहरातच राहतात त्यांना आम्हा व्यावसायिकांच्या वतीने दरमहा किराणा देण्यात येत आहे.'' 

आकडे बोलतात

  • पुण्यातील व्यावसायिकांची संख्या - 500 
  • पिंपरी-चिंचवडमधील व्यावसायिक - 800 
  • एका व्यावसायिकाची सरासरी वार्षिक उलाढाल - 2 ते 40 लाख रुपये 
  • व्यवसायाला बसलेला यंदाचा आर्थिक फटका - 100 ते 150 कोटी रुपये 
  • या क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या - 5000 


यंदाच्या सिझनअगोदर अनेक व्यावसायिकांनी सिझनसाठी नवीन प्रकारच्या खुर्च्या, टेबल, कापड, सजावटीचे साहित्य, कापडी कव्हर यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, यंदा अद्याप काहीही धंदा झालेला नाही. त्यामुळे अनेक व्यावसायिक अडचणीत आले आहेत. 

- विजय दगडे, अध्यक्ष, अखिल भारतीय मंडप व्यावसायिक संघटना-पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

Viral Video: हायवेवर थरारक स्टंट करत होती ताई, पण क्षणात घडले असं काही की व्हिडिओ पाहून धक्का बसेल

Kolhapur Mayor Results : कोल्हापुरात महायुतीचा दबदबा! महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, तर उपमहापौरपदी अक्षय जरग यांची बाजी; काँग्रेसचा पराभव

चार दिवसांत पत्नी गर्भवती कशी राहू शकते? आर्मीत असलेल्या पतीची थेट हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Canada Work Permit Rules: कॅनडामध्ये नोकरी करायची आहे? मग 'ही' चूक करू नका, नाहीतर देश सोडावा लागेल...

SCROLL FOR NEXT