pay and park 
पिंपरी-चिंचवड

‘Pay and Park : पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारपासून पार्किंग पॉलिसी

महापालिकेच्या स्थापत्य बीआरटी विभागामार्फत पार्किंग पॉलिसीची कार्यवाही केली जाणार

सकाळ वृत्तसेवा

- मुख्य १३ रस्ते, उड्डाणपुलांखालील जागा निश्‍चित

- महापालिका व पोलिसांकडून ४५० ठिकाणी आखणी

पिंपरी : महापालिका गुरुवारपासून (ता. १) पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करणार आहे. ‘पे अँड पार्क’ स्वरूपाची ही योजना असून, शहरातील मुख्य १३ रस्ते व उड्डाणपुलांखालील काही जागांचा यात समावेश आहे. यासाठी ४५० ठिकाणे निश्‍चित केली आहेत.

महापालिकेच्या स्थापत्य बीआरटी विभागामार्फत पार्किंग पॉलिसीची कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती केली आहे. शहरातील सर्व पार्किंग ठिकाणांची माहिती महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहेत. ‘नो-पार्किंग’ झोनमध्ये उभी केलेली वाहने उचलून नेण्यासाठी निर्मला ऑटो क्रेन सेंटरची नियुक्ती केली आहे. वाहने उभी करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेने रस्त्यांच्या कडेला आखणी केलेली आहे.

दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांच्या आकारानुसार पांढरे पट्टे मारून आखणी केली आहे. दरम्यान, शहरात वाहन पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त राजेश पाटील व पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नो-पार्किंगमधील कारवाईसाठी पोलिस आयुक्तालयांकडील मोबाईल अॅपचा वापर केला जाणार आहे. टोईंग व्हॅन उपलब्ध केल्या आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर निगडी ते दापोडीदरम्यान मुख्य मार्ग व सेवा रस्त्यावर इन व आउट पंचिंगच्या रचनेत बदल केला आहे.

प्रमुख जिल्हा मार्ग

पार्किंग पॉलिसी शहरातून जाणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्गावरही (एमडीआर) राबवली जाणार आहे. त्याच्या एका बाजूला ३१ व दुसऱ्या बाजूला ३९ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. टेल्को रस्त्यावरील केएसबी चौक ते हिंजवडीतील शिवाजी चौक या दरम्यानचा समावेश ‘एमडीआर’मध्ये होतो. या मार्गावर चिंचवड स्टेशन, चापेकर चौक, थेरगाव, डांगे चौक, भूमकर चौक आदी चौकांचा समावेश होतो.

रस्त्यावरील पार्किंगची ठिकाणे

ठिकाण / वाहनसंख्या

भोसरी-निगडी टेल्को रस्ता / ५६

भोसरी-निगडी स्पाइन रस्ता / ५५

कासारवाडी-वाकड रस्ता / ४१

जुना मुंबई-पुणे रस्ता / ५८

काळेवाडी फाटा-देहू आळंदी रस्ता / ३६

औंध-रावेत बीआरटी रस्ता / १६

निगडी-वाल्हेकरवाडी रस्ता / २९

टिळक चौक-बिग इंडिया चौक / ८

प्रसुनधाम सोसायटी रस्ता / ११

थेरगाव गावठाण रस्ता / १२

पुणे-नाशिक महामार्ग / २४

वाल्हेकरवाडी रस्ता / १५

उड्डाणपुलाखालील पार्किंग ठिकाणे

- रॉयल ग्लोरी सोसायटी वाकड

- रहाटणी स्पॉट १८ मॉल

- अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी

- प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड

- भक्ती-शक्ती उड्डाणपूल निगडी

- एम्पायर इस्टेट उड्डाणपूल चिंचवड

- चापेकर चौक चिंचवड

- पिंपळे सौदागर वाहनतळ

- मधुकर पवळे उड्डाणपूल निगडी

https://www.esakal.com/pune/the-administration-has-decided-to-go-directly-to-the-slums-and-get-vaccinated-people

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SWAYAM Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SWAYAM जानेवारी 2026 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षा कधी होणार

Gold Rate Today : सोनं-चांदी सुसाट! जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे MCX बाजारात सोनं २ हजारांनी महागलं; मकर संक्रांतीला भाव कमी होणार?

ट्रम्प व्हेनेझुएलाचे काळजीवाहू राष्ट्रपती, स्वत:च शेअर केला फोटो; काय म्हणाले?

IND vs NZ 1st ODI : भारताला मोठा धक्का! रिषभ पंतनंतर आणखीन एका सुपरस्टारची मालिकेतून माघार; वर्ल्ड कपपूर्वी वाढली चिंता

SCROLL FOR NEXT