Cyber Fraud PCMC eSakal
पिंपरी-चिंचवड

Cyber Fraud : ॲपद्वारे फसवणूक, पुण्यातील टोळी अटकेत.. परदेशात चार कोटी रुपये पाठविल्याचे उघड; १२० बँक खाती सापडली

Cyber Scam : हाँगकाँगच्या जाहिरातीमुळे अनेक गुंतवणूकदार या आमिषाला बळी पडले. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार ग्रेग हा हाँगकाँगमध्ये राहतो.

सकाळ वृत्तसेवा

PCMC Cyber Fraud : ‘‘बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक करणाऱ्या पुण्यातील पाच जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडे १२० पेक्षा जास्त बॅंक खाती सापडली असून या खात्यावरून चार कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम काढून ती सुएसडीटी क्रिप्टोकरन्सीमार्फत हाँगकाँग येथे पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे,’’ अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

जुनेद कुरेशी (वय २१ रा. टिंगरेनगर), सलमान शेख (वय २२, रा.लोहगाव रोड), अब्दुल अन्सारी (वय, २३ रा. लोहगाव रोड), आकिफ अन्वर (वय २९, रा. कोंढवा खुर्द) आणि तौफिक शेख (वय २२ रा. लोहगाव रोड) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

फेब्रुवारी महिन्यात बाणेर येथील एका महिलेला इंस्टाग्रामवर शेअर मार्केट क्लासेसच्या संदर्भातील जाहिरातीची पोस्ट दिसली. संबंधित महिलेला यामध्ये आवड असल्याने अधिक माहितीसाठी या पोस्टवर क्लिक केले. सूचनेप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना शोडर अकादमी व्हीआयपी ३४ (Schoder Academy VIP 34) या व्हॉटस्ॲप ग्रुपवर जोडले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे इन्स्टिट्यूशनल डी मॅट अकाउंट काढले. त्यासाठी त्यांच्याकडून एक अर्ज भरून घेतला.

आयपीओ खरेदी, शेअर खरेदीच्या नावाखाली ३१ लाख ६० हजार रुपये घेण्यात आले. त्यांनी रक्कम परत मागितल्यावर चॅरिटी डोनेशनसाठी चार लाख रुपयांची मागणी केली. हे सर्व पैसे भरूनही गुंतवणूक केलेली रक्कम परत न मिळाल्याने संबंधित महिलेने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली. अटक केलेल्या आरोपींकडून सात मोबाईल फोन, नोटा मोजण्याचे एक मशिन, वेगवेगळ्या बॅंकांचे आठ डेबिट कार्ड, अकरा वेगवेगळ्या बॅंकांचे चेकबुक, पंजाब नॅशनल बॅंकेचे पासबुक, रोख सात लाख रुपये एवढा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुख्य सूत्रधार हाँगकाँगमध्ये

हाँगकाँगच्या जाहिरातीमुळे अनेक गुंतवणूकदार या आमिषाला बळी पडले. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार ग्रेग हा हाँगकाँगमध्ये राहतो. तेथून तो हे फसवणुकीचे रॅकेट चालवीत असल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. हाँगकाँगमधून सोशल मीडियावर याबाबतच्या जाहिराती व लिंक तयार करण्यात आल्या आहेत. या जाहिरातींवर संपर्क केल्यास संबंधित रॅकेट चालविणाऱ्यांकडून फोन येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT