Pig catching campaign on behalf of Lonavala Municipal Council 
पिंपरी-चिंचवड

लोणावळा नगरपरिषदेने आवळल्या मोकाट डुक्करांच्या मुस्क्या

सकाळवृत्तसेवा

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीतील डुक्करांपासून प्रादुर्भाव रोखण्यासाठी डुक्करे पकडण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी केवळ भांगरवाडी प्रभागात नगरपरिषदेने केलेल्या कारवाईत २८ डुक्करे पकडण्यात यश आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भांगरवाडी, नांगरगाव, वळवण, खंडाळा, भुशीसह सर्वच प्रभागांमध्ये मोकाट डुक्करांचा उपद्रव वाढत आहे. नगरपरिषदेच्यावतीने मोकाट डुक्करे पकडण्यासाठी निवीदा प्रक्रीयाही राबविण्यात आली. सध्या कोरोना, डेगी रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी रवी पवार यांनी मोकाट डुक्करे पकडण्याच्या सूचना आरोग्य विभागाला करण्यात आल्या.

अकरावी अॅडमिशन : पहिल्या दिवशी 'इतक्या' विद्यार्थ्यांनी केले ऑनलाईन रजिस्ट्रेशन! 

आरोग्य निरीक्षक तन्वीर मेमन यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने सार्वजनिक ठिकाणी प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोकाट डुक्करे पकडण्याची मोहीम सुरु करत केवळ भांगरवाडी प्रभागात पहिल्याच दिवशी २८ डुक्करे पकडण्यात आली. नगरपरिषदेच्या वतीने डुक्करे पडकडण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगत डुक्करे पाळणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT