PCMC_Transgender 
पिंपरी-चिंचवड

PCMCचा पथदर्शी उपक्रम; तृतीयपंथीयांना दिली नोकरीची संधी

महापालिकेच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेनं एक पुरोगामी पाऊल उचललं असून तृतीयपंथी व्यक्तींना पालिकेत नोकरी देण्याचा पथदर्शी निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी हा निर्णय घेतला असून तृतीयपंथीयांना आत्मसन्मानानं जगता यावं यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. (Pilot initiative of Pimpri Chinchwad Municipal Corporation Job opportunities given to transgender)

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत आम्ही तृतीयपंथीयांना सिक्युरिटी गार्ड आणि ग्रीन मार्शल्स म्हणून नोकऱ्या देणार आहोत. याद्वारे त्यांना आत्मसन्मानानं जगता येईल तसेच स्वतःची एक ओळखही निर्माण करता येईल.

तृतीयपंथीयांसाठी अशा प्रकारे रोजगाराबाबत ठोस कार्यक्रम राबवणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही बहुतेक पहिलीच महापालिका ठरली आहे. दरम्यान, पालिकेच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लेन पूर्ण बंद, पुणे मार्गावर १२ किमी वाहनांच्या रांगा; उलटलेल्या टँकरमधून गॅस गळती वाढली

Pankaja Munde: बाबासाहेबांना अभिवादन नाही… अन् गाव आक्रमक! पंकजा मुंडेंना ग्रामस्थांनी रोखलं, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज आजही विस्कळीत

Chhatrapati Sambhajinagar Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’ची भाजपला धक्का देण्याची तयारी; राजकारणात सगळं शक्य, इम्तियाज जलील यांचा इशारा!

मुंबई एक्सप्रेसवे वाहतूक ठप्पच, पर्यायी मार्ग वापरा; प्रवासाला ४-५ तास जास्त लागू शकतात, ट्राफिक पोलिसांचे आवाहन

SCROLL FOR NEXT