rainfall sakal media
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : शहर परिसरात दिवसभर पावसाची रिमझिम

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहर व परिसरात (pimpari city and area) शनिवारी (Saturday) (ता. १४) दिवसभर पावसाने हजेरी (rainfall) लावली. यामुळे वीकेंडनिमित्त (weekend) घराबाहेर पडलेल्यांची धांदल उडाली.

मागील महिन्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला. शहरातील नद्यांनाही पूर आला. सलग तीन-चार दिवस पाऊस सुरूच होता. सूर्यदर्शनही झाले नव्हते. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. कधीतरी तुरळक स्वरूपात बरसायचा. शनिवारीही सकाळी आकाश निरभ्र होते. मात्र, सकाळी अकरानंतर ढग दाटून येऊ लागले. त्यानंतर शहरासह परिसरात पावसाला सुरुवात झाली. दुपारच्यावेळी आणखी जोर वाढला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने छत्री, रेनकोट न घेताच घराबाहेर पडलेल्यांची मोठी गैरसोय झाली.

पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्यालगतच्या झाडांचा व पुलाचा आधार घेतला. यामुळे ग्रेडसेप्रेटरमधील पुलाखालीही वाहनांची गर्दी झाल्याने इतर वाहनांचा वेग मंदावला. तसेच, रस्त्यावरील धूळ व पावसाचे पाणी यामुळे चिखल निर्माण झाल्याने काही ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या. रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने चालकांना कसरत करावी लागली. दिवसभर रिमझिम सुरूच होती.

खरेदीचे नियोजन कोलमडले

शनिवार सुटीचा दिवस असल्याने व दुकानेही सुरू असल्याने अनेकांनी खरेदीचे नियोजन केले. त्यासाठी सहकुटुंब खरेदीसाठी घराबाहेरही पडले. मात्र, पावसाने हजेरी लावल्याने खरेदीचे नियोजन कोलमडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT