Vaccination  sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : ९० टक्के नागरिकांनी घेतला पहिला डोस

पहिला डोस घेतलेल्या नागरिकांच्या संपर्क क्रमांकानुसार शोध घेऊन घरोघरी जाऊन दुसरा डोस दिला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लशीचे २० लाखांहून अधिक डोस महापालिकेने दिले आहेत. त्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ८७ टक्के असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांच्या संपर्क क्रमांकानुसार शोध घेऊन घरोघरी जाऊन दुसरा डोस दिला जात आहे.

कोरोना विरुद्ध लढ्यासाठी नागरिकांची प्रतिकारशक्ती महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने शहरात १६ जानेवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला फ्रंट लाइन वर्कर व आरोग्य-वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने व लशीच्या उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनंतर ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याचे उद्दिष्ट होते. सध्या अठरा वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यांना प्राधान्य आहे. परदेशात जाणारे विद्यार्थी व नागरिकांसाठी काही डोस राखीव ठेवले आहेत. तसेच, गर्भवती व स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव असतात. त्यांच्यासाठी महपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयस्तरावरील आठ केंद्रांवर दैनंदिन स्वरूपात लसीकरणाची व्यवस्था केली आहे.

तीन प्रकारची लस

महापालिकेच्या केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. तर, खासगी केंद्रांवर या दोन्ही लशींसह स्फुटनिक व्ही लसही उपलब्ध आहे. मात्र, महापालिकेतर्फे मोफत लस दिली जात असून खासगी केंद्रांवर शुल्क आकारणी केली जात आहे. शहरातील काही नागरिकांनी शहराबाहेरील आणि शहराबाहेरील काही नागरिकांनी शहरातील केंद्रावर लस घेतली आहे. महापालिकेच्या केंद्रांद्वारे २० लाखांहून अधिक डोस दिले गेले असून खासगी केंद्रांद्वारे सव्वापाच लाखांवर डोस दिले आहेत. त्यातही कोव्हिशिल्डचे डोस २३ लाखांवर, कोव्हॅक्सिनचे डोस दोन लाखांवर आणि स्फूटनिक व्हीचे डोस २५ हजारांपर्यंत दिले आहेत.

"महापालिकेतर्फे ६८ केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे. सध्या दोन लाख डोस उपलब्ध आहेत. लशीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांच्या यादीनुसार दुसरा डोस देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. घरोघरी जाऊन पहिला वा दुसरा डोस घेतला आहे का? अशी विचारणा करून नोंद घेतली जात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी त्यांच्या घराजवळच्या ठिकाणी दवाखाना, समाजमंदिर, धार्मिकस्थळे अशा ठिकाणी केंद्र उभारून लस देण्याची व्यवस्था केली आहे."

- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT