पक्षी  sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : पक्षी अधिवास नष्ट झाल्यामुळे कृत्रिम घरट्याचा स्वीकार

उमेश वाघेला, पिंपळनेरकर यांचे निरीक्षण

सकाळ वृत्तसेवा

टोपीवाल्या पक्ष्याचे उभ्या पाईपमध्ये घरटे

उमेश वाघेला, पिंपळनेरकर यांचे निरीक्षण

पिंपरी : काही पक्षी अधिवास नष्ट झाल्यामुळे किंवा त्यांना घरट्यासाठी हवी असलेली विशिष्ट प्रकारची झाडे व जागा नष्ट झाल्यामुळे ते कृत्रिम घरट्याचा स्वीकार करत आहेत. निगडीतील दुर्गादेवी टेकडीवर पक्षी निरीक्षण करताना टोपीवाला पक्ष्याचे एका उभ्या पाईपमधे अनोखे घरटे आढळून आले आहे. मुबलक प्रमाणात नैसर्गिक अधिवास तसेच घरट्यासाठी कृत्रिम जागा असूनही अगदी वेगळ्याच ठिकाणी टोपीवाल्याने केलेल्या अनोख्या घरट्याचा अलाईव्हचे पक्षी अभ्यासक प्रशांत पिंपळनेरकर, दर्शना पिंपळनेरकर आणि उमेश वाघेला यांना शोध लावला आहे.

पक्षी अभ्यासक पिंपळनेरकर म्हणाले, ‘‘टोपीवाला पक्षी रामगंगा, राखी वल्गुली या नावानेसुद्धा परिचित असून, इंग्रजीत ‘सिनेरिअस टिट’ म्हणतात. हे पक्षी किटक, फुलांच्या पाकळ्या, फळे खातात. टोपीवाला पक्ष्याचा विणीचा काळ फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान असतो. आपल्याकडे तसेच दक्षिणेकडे क्वचित यांची घरटी सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये देखील आढळतात.’’

अलाईव्हचे अध्यक्ष व पक्षी तज्ज्ञ उमेश वाघेला म्हणाले, ‘‘टोपीवाला पक्षी नैसर्गिक अधिवासात झाडाच्या ढोलीत, छपरांखाली किंवा भिंतीच्या छिद्रात, डोंगर उतार तसेच दरडीतल्या छिद्रात, खंड्या पक्ष्याने सोडून दिलेल्या बिळात देखील घरटे थाटतात. तांबट किंवा सुतार पक्ष्याची जुनी घरटीसुद्धा स्वीकारतात. टोपीवाला पक्ष्याने उभ्या पाईपमध्ये खाली घरटे केल्याचे पहिल्यांदाच आढळून आले आहे. पिल्ले घरट्यातून सुखरूप उडून जाईपर्यंत सर्व निरीक्षणे नोंदवली आहेत. अशा घरट्याची भारतात ही बहुधा पहिलीच नोंद असल्याचे अभ्यासाअंती समजले आहे. याचा शोधनिबंध आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT