Bribe sakal media
पिंपरी-चिंचवड

लाच स्विकारल्याप्रकरणी दोन लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

महापालिकेच्या थेरगाव येथील कार्यालयात कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मिळकतीचे हस्तांतरण व कर पावतीमधील नावाची दुरुस्ती करण्यासाठी लाच (Bribe) घेणारे महापालिकेचे दोन लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. ही कारवाई थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Corporation) ड क्षेत्रीय कार्यालयात शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी करण्यात आली.

प्रदीप शांताराम कोठावदे (वय 39), हैबती विठ्ठल मोरे (वय 51) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहे. हे दोघेही महापालिकेच्या थेरगाव येथील क्षेत्रीय कार्यालयातील कर संकलन विभागात लिपिक पदावर कार्यरत आहेत. तर यातील तक्रारदार यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असून ते फ्लॅट, शॉप, ऑफिस भाड्याने देणे तसेच भाडे करारनामा, खरेदी खत मिळकतीचे हस्तांतरण आदी कामे करतात. दरम्यान, तक्रारदार त्यांच्याकडे आलेल्या लोकांच्या मिळकतीचे हस्तांतरण व कर पावतीतील नावाच्या दुरुस्ती करण्यासाठी आरोपींना भेटले असता कोठावदे याने साडेपाच हजार तर मोरे याने तीन हजारांच्या लाचेची मागणी केली .

दरम्यान, याबाबत तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी क्षेत्रीय कार्यालयात सापळा रचण्यात आला व दोघांनाही ताब्यात घेण्यात आले . रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT