पिंपरी-चिंचवड

Pimpri : करंजगावात विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू

महिन्यातील तिसरी घटना ; महावितरणच्या बेजवाबदारपणाचा शेतकरी ठरतोय बळी

दिनेश टाकवे

करंजगाव : नाणे मावळातील करंजगाव येथील माळावर महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याच्या म्हशीला जीव गमवावा लागला तर स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका म्हशीचे प्राण वाचले. नाणे मावळातील एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना असून नागरिकांमध्ये महावितरण बद्दल संतापाची भावना आहे.

करंजगाव येथील माळावर दोन दिवसांपूर्वी डीपीडीसी अंतर्गत महावितरणकडून विद्युत वाहिनीचे काम करण्यात आले होते. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या दोनच दिवसात खांबावरील तारा जमिनीवर आल्या. तारांमध्ये असणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येताच गणेश सुरेश पोटफोडे यांच्या म्हशीचा मृत्यू झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी दगड मारुन दुसऱ्या म्हशीला पळवून लावल्याने सुदैवाने तिचा जीव वाचला.

दरम्यान,याच आठवड्यात नाणे गावातील एका शेतकऱ्यांच्या गाईचा विद्युत प्रवाहाच्या संपर्कात याचा मृत्यू झाला होता. एकाच आठवड्यात मावळातील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये महावितरणबद्दल प्रचंड रोष असून महावितरणने लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असे विकास पोटफोडे, सहादू पोटफोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ साबळे यांनी सांगितले.

दोन तरुणांनाही प्राण गमावले

पठारावर मेंढीमाळात विजेचा करंट

बसून शिरदेतील अविनाश खेमाजी

बगाड (वय १६), रवींद्र सीताराम

बगाड (वय २३) या शिरदे गावातील तरुणांचा जागेवर मृत्यू झाला.

प्रमोद महाजन ( सहाय्यक कार्यकारी अभियंता एमएसईबी ) : डीपीडीसी अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची व संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्यात येणार असून मृत म्हशीच्या मालकाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT