पिंपरी-चिंचवड

महत्त्वाची बातमी : पिंपरी कॅम्पबाबत आता नवा आदेश

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : पिंपरी कॅम्पसह नजिकच्या साई चौक, भाटनगर, बौद्धनगर, आंबेडकर नगर, रमाबाई नगर,  वैष्णव देवी मंदिर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे संपूर्ण कॅम्प परिसर २५ जूनपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे, असा आदेश महापालिका ग क्षेत्रीय कार्यालय अधिकारी स्मिता झगडे यांनी काढला आहे.

पिंपरी कॅम्प परिसरातील मुख्य बाजारपेठ, शगून चौक, कराची चौक, साई चौक, आर्य समाज चौक, गेलार्ड चौक, माता रमाबाई आंबेडकर चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक, मेन बाजार लेन, रिव्हर रोड, रेल्वे स्टेशन रोड आदी परिसर सोमवारपासून तीन दिवस अर्थात २५ जूनपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, सम-विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवावे, गर्दी टाळावी या अटीनुसार पिंपरी कॅम्पातील दुकाने उघडण्यास महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र, कोणीही नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, साई चौक, बौद्ध नगर, भाटनगर, रमाबाई नगर, आंबेडकर नगर, नानेकर चाळ, वैष्णव देवी मंदिर परिसर आदी भागात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. शिवाय संख्या वाढत आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्प व परिसर बंद ठेवण्यात आला आहे. याबाबत परिसरात रिक्षा द्वारे स्पिकर लावून माहिती दिली जात आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी कॅम्प ही पिंपरी चिंचवड शहरासह लगतच्या खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, धानोरे, च-होली, केडगाव, चिंबळी, महाळुंगे, निघोजेसह देहू, देहूरोड, सोमाटणे, हिंजवडी, माण, मारुंजी, जांभे, कासारसाई आदी गावांसाठी मोठी बाजारपेठ आहे. अनेक नागरिक येथे खरेदी साठी येत असतात. दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली बाजारपेठ पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे. ती पुन्हा सुरू होण्यासाठी आणखी पाच दिवस वाट पहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune News : पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही अधिकाऱ्‍यांचा परदेश दौरा

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT